MLA Makrand Patil : वाई : एका छोट्याशा गावात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील विठ्ठल आणि रजनी माने या दांपत्याने शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून नवीन पिढी घडविण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. आपल्या कामातून त्यांनी शैक्षणिक कार्याचा ठसा उमटविला आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिका साकारताना प्रत्येक भूमिकेला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांचा स्वभाव मृदू व गोड असून, ते बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत, असे प्रतिपादन वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी केले.
सेवागौरव समारंभात आमदार पाटील बोलत होते…
प्राथमिक शिक्षक समिती व संघाच्यावतीने आयोजित शिक्षिका रजनी व केंद्रप्रमुख विठ्ठल माने यांच्या सेवागौरव समारंभात आमदार पाटील बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, प्रमोद शिंदे, विश्वनाथ पवार, राज्य शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, शंकर देवरे, महेंद्र जानुगडे, राजेंद्र बाबर, तानाजी नरळे, प्रभावती चव्हाण, एच. व्ही. जाधव, रवींद्र खंदारे, चंद्रकांत यादव, राजेंद्र तांबे, शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, अनिल सावंत, विक्रांत डोंगरे, महादेव मस्कर, प्रकाश चव्हाण, मदन भोसले, मनोज पवार, रंजना डगळे, शारदा ननावरे, मच्छिंद्र ढमाळ, मधुकर कांबळे, अरुण पाटील, किरण यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
याबाबत बोलताना आमदार पाटील म्हणाले की, विठ्ठल माने यांचा जन्म खोलवडी येथील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन शिक्षक, मुख्याध्यापक ते केंद्रप्रमुख अशी ३८ वर्षे शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा करतानाच नवीन पिढी घडविण्याचे कार्य केले. शिक्षण, सहकार व समाजकारणाचा तालुक्याचा वारसा माने यांनी पुढे चालवला. त्यांनी शिक्षकांचे संघटन, शिक्षक बँकेचे अध्यक्ष, उत्कृष्ट निवेदक तसेच पत्रकार म्हणून समाजासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. MLA Makrand Patil
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, रजनी व विठ्ठल यांनी अखंड ज्ञानदानाचे काम केले आहे. त्यांना जीवनाच्या सायंकाळी सौख्य लाभावे. निमंत्रण नसताना आज विठ्ठलाला भेटायला आलोय, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. स्वागत, सूत्रसंचालन यामध्ये काही चांगले शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडतात, तेव्हा प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध दरवळतो. त्या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे सुखदुःखाच्या कार्यक्रमात सहभाग दिला आहे.
कृतज्ञता व्यक्त करताना विठ्ठल माने म्हणाले की, विद्यार्थी व पालकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या क्षेत्रात कारकीर्द करता आली. माझे यशस्वी विद्यार्थी हेच याचे उदाहरण आहे. शिक्षक संघटनेत लोकाभिमुख राहून काम केले. त्याचा परतावाही शिक्षकांनी विश्वासाने दिला. MLA Makrand Patil
या वेळी प्रताप पवार, अरुणादेवी पिसाळ, उदय शिंदे, विकास घोणे, आनंदराव डेरे, जयवंत मांढरे, मंगेश चोरगे, गुरुनाथ राठोड, दीपक भुजबळ, सतीश शेंडगे यांची भाषणे झाली. सुरेश मोरे यांनी प्रास्ताविक केले. सचिन पांढरपोटे, सहदेव फणसे, राजेंद्र दगडे, नितीन फरांदे, नारायण शिंदे, अनिल पिसाळ, भास्कर पोतदार, शिवाजी शिंदे, रवी ओवाळ, संतोष शिंदे, मुरली पवार यांनी स्वागत केले. रवींद्र लटिंगे, केशव कोदे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल तांबोळी यांनी मानपत्र वाचन केले. MLA Makrand Patil
या कार्यक्रमास मधुकर भोसले, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, दीपक बाबर, रतनसिंह शिंदे, दत्ता मर्ढेकर, शशिकांत पवार, सुरेश बाबर, चंद्रकांत आखाडे, दगडू ढेबे, संतोष बाबर, जयवंत पिसाळ, विश्वास पवार, भद्रेश भाटे, सतीश नलवडे, पांडुरंग भिलारे, विठ्ठल फडतरे, विलास साळुंखे, पुष्पलता बोबडे, सुभाष ढालपे, सुलभा सस्ते, विशाल कणसे, लहू चव्हाण, तानाजी कचरे, अनिल ठोंबरे, सुनील संकपाळ, डॉ. शेखर कांबळे, अशोक येवले, डॉ. आनंद भोसले, डॉ. मदन जाधव, निवास शिंदे, पोपट जगताप, संतोष मासाळ, नारायण सपकाळ आदी उपस्थित होते.