Indapur News : इंदापूर : म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना रिंगचा भाग विहिरीत कोसळून त्यामध्ये ४ कामगार अडकण्याची घटना ही दुर्दैवी आहे. असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या दुर्घटने संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांशी रात्री संपर्क करून सर्वतोपरी मदतकार्य करणे संदर्भात चर्चा केली. (Indapur News)
कामगार अडकण्याची घटना ही दुर्दैवी;
या दुर्घटनेची माहिती अँड.शरद जामदार, यांचेकडून काल मंगळवारी (ता.१) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हर्षवर्धन पाटील यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, पाटील यांनी तातडीने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांशी दुर्घटने संदर्भात संपर्क करून मदत करण्याच्या सूचना दिल्या. (Indapur News)
दरम्यान, या दुर्घटनाग्रस्त विहिरीमध्ये रिंगसह मुरमाचा ढीगारा कोसळल्याने त्यामध्ये सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण, मनोज मारुती चव्हाण हे चार बेलवाडी (ता. इंदापूर) गावचे कामगार अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आपत्कालीन यंत्रणेचा भाग असलेले एनडीआरएफचे जवान या ठिकाणी मदत कार्य करीत आहेत.