Shirur News : शिरूर, (पुणे) : माजी आमदार बाबुराव पाचर्णे हे तळमळीने व सच्चेपणाने काम करणारे लोकसेवक होते. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या पाचर्णे यांनी कोणतीही राजकीय पार्शवभूमी नसताना स्वत: ची राजकीय कर्तृत्व व कार्यकिर्द घडविली. त्यांचे स्मारक सर्वसामान्यांना व कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देणारे राहील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. Shirur News
दिवगंत आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने मंगळवारी (ता. ०१) तर्डोबाचीवाडी (ता. हवेली) येथे त्याचे स्मारक उभे करण्यात आले आहे. पवार यांनी या स्मारकाचे लोकार्पण करुन अभिवादन केले. यावेळी वरील प्रतिपादन अजित पवार यांनी केले. Shirur News
यावेळी पाचर्णे यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, मालती पाचर्णे, कर्नल महेश शेळके, राणी शेळके, बी जी पाचर्णे, माजी मंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार नीलेश लंके, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रदीप वळसे-पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, भाजपाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक नितीन पाचर्णे, जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष निवृतीअण्णा गवारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर, मानसिंग पाचुंदकर, प्रा. डॉ. राजेराम घावटे, पांडुरंग थोरात, महेश ढमढेरे, पांडुरंग दुर्गे, दौलतराव खेडकर, राजेद्र चव्हाण आदी शिरूर-हवेलीतील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
यापुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “शिरुर मध्ये चांगले काम आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केले. चासकमान धरण, एमआयडीसी, पुणे नगर रस्ता यामुळे शिरुरच्या विकासाचे चित्र बदलले. Shirur News दोनवेळा आमदार राहिलेल्या पाचर्णे यांनी विधानसभेत शिरुरचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. सर्वसामान्यांशी थेट संवाद साधण्याची हातोटी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यशी स्नेहाचे संबध जोपासले. सामान्य माणसांना पाचर्णे यांच्या विषयी प्रेम, जिव्हाळा आपुलकी होती.
प्रास्ताविकात राहूल पाचर्णे म्हणाले की, आमदार बाबूराव पाचर्णे यांनी ४४ वर्षात सर्वसामान्याचे हित जपले. ते लोकनेते होते. खडतर असे जीवन त्याचे होते. सातत्याने संघर्ष पाचर्णे यांनी केला. संघर्ष योध्दा पाचर्णे यांच्या स्मारकातून कार्यकर्त्याना उर्जा व शक्ती मिळेल. Shirur News
यावेळी इंदापूरचे आमदार दतात्रय भरणे म्हणाले, “बाबूराव पाचर्णे हे अभ्यासु व्यक्तिमत्व होते मतदारसंघातील अनेक प्रश्न अभ्यासू पध्दतीने मांडले. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे म्हणाले, “लोकांना न्याय देण्याचे काम करित दोन वेळ्या विधानसभेला शिरुर मधुन बाबूराव पाचर्णे निवडून गेले. शिरुर तालुक्याचा विकास त्यांनी केला. पारनेरचे आमदार नीलेश लंके म्हणाले की, “पाचर्णे हे सर्वसामान्याच्या सुख दु :खात सहभागी होणारे नेतृत्व होते.” Shirur News
दरम्यान,यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी केले तर आभार नितीन पाचर्णे यांनी मानले.