Pachagani News : पाचगणी, (सातारा) : सुरुर – पोलादपूर राज्य मार्गावर पाचगणी नजीक भोसे खिंड नजिक वठलेल्या झाडाची फांदी प्रवासांना धोकादायक ठरत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभागाचे अधिकाऱी एकमेकांवर जबाबदारी ढकलून नामानिराळे झाले आहेत. (Pachagani News)
धोकादायक फांद्यांची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर असतानाही संबंधित विभागाच्या मस्तवाल अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा शासनाला कधी कळणार कधी? अशी बातमी “पुणे प्राईम न्यूज”ने मंगळवारी (ता. २५) प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर धोकादायक फांदी काढून टाकल्याबद्दल प्रवासी व नागरिकांनी “पुणे प्राईम न्यूज”चे कौतुक केले आहे. (Pachagani News)
महसूल विभागाचे अधिकाऱी एकमेकांवर जबाबदारी ढकलून नामानिराळे..
मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मनामा फॅक्टरी समोरील एका वठलेल्या झाडाची फांदी धोकादायक झाल्याने या रस्त्यावरून ये-जा करणा-या प्रवासांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे वृत्त पुणे प्राईम न्यूज प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची त्वरित दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने पाचगणी पोलिसांच्या मदतीने सदर झाडाची धोकादायक फांदी काढून टाकली. यावेळी मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. (Pachagani News)
दरम्यान, नागरिक व पर्यटकांच्या डोक्यावर धोकादायक फांदीची टांगती तलवार असल्याचे वृत्त पुणे प्राईम न्यूजने बातमीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाला आपल्या कर्तृत्वाची जाणीव करून दिल्याने बांधकाम विभाग खडबडून जागा झाला व सदर धोकादायक फांदी काढून टाकल्याबद्दल पर्यटक, नागरिक व दुकानदारांकडून समाधान व्यक्त होत आहे.