Indapur News : इंदापूर : जागेच्या वादातून मारहाण, खुनी हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर परिसरात असाच धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. एका गटाने दुसऱ्या गटावर दहशत माजवण्यासाठी हातात काठ्या घेऊन गावातून फेरी मारत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. गायरानातील जागेच्या वादातून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अंथुर्णे गावात शनिवारी (ता. २९) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी ३० ते ३२ जणांविरूद्ध वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे..
वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, याप्रकरणी कुलदीप आप्पा मोरे (वय ३८, रा. अंथुर्णे, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश मारूती शिंदे, दीपक भोसले, अनिकेत धुमाळ, हेमंत दगडे, अल्ताफ शेख, अक्षय शिंदे, सुमित शिंदे यांच्यासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरणेवाडी ग्रामपंचायतीच्या पाठीमागील गायरान जमिनीत राहण्यासाठी कुलदीप मोरे, दीपक भारत साबळे, राहुल गोपाळ सोनवणे, भीमराव मधुकर साबळे, रोशन सूर्यभान मोरे यांनी जागा धरली आहे. (Indapur News) या जागेत पत्र्याची शेड मारण्यासाठी काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी आरोपी गणेश मारुती शिंदे हा तेथे आला आणि जाब विचारत धमकी देणे आणि शिविगाळ सुरू केली.
गणेश शिंदे यांनी कोणाला विचारून तुम्ही येथे जागा धरली, अशी विचारणा केली. याशिवाय माझ्या ओळखी खूप मोठ्या गुंडांशी आहेत. (Indapur News) तुमच्याकडे संध्याकाळी बघून घेतो म्हणत, जीवे मारण्याची धमकी देऊन तो निघून गेला.
या घटनेनंतर फिर्यादी व दीपक साबळे, राहुल सोनवणे, भीमराव साबळे, रोशन मोरे, प्रतीक दीपक साबळे हे अंथुर्णे येथील बौद्ध समाज मंदिरासमोर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी टाकलेल्या सिमेंटच्या पाइपवर बसलेले होते. या वेळी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गणेश शिंदे व इतर आरोपी हातात काठ्या घेऊन तेथे आले. (Indapur News) फिर्यादी व त्याचे सहकारी बसलेल्या ठिकाणापासून त्यांना शिविगाळ करत हा जमाव अंथुर्णे स्मशानभूमीपासून परत माघारी आला. दहशतीला घाबरून फिर्यादी व त्याचे सहकारी घरी निघून गेले, असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये शूर क्रांतिकारक रेंगा कोरकू जयंती साजरी..