Mumbai News : मुंबई : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे नुकताच वेस्ट इंडिज दौऱ्यातून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर भारतात परतला आहे. त्यानंतर लगेचच त्याने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने इंग्लंडमधील काउंटी क्लब लिसेस्टरशायर संघाकडून चालू हंगामात खेळण्यास नकार दिला आहे.(Mumbai News)
२ सामन्यांची कसोटी मालिका ही १-० ने जिंकली.
टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका ही १-० ने जिंकली. टीम इंडियाला दुसरा सामना जिंकण्याची संधी होती. मात्र, दुसऱ्या सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ वाया गेला. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. पावसाने विंडिजची लाज राखली. तर टीम इंडियाला असलेली व्हॉईटवॉश देण्याची संधी पावसाने हिरावून घेतली. या कसोटी मालिकेत डेब्यूटंट यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा आणि विराट कोहली या त्रिकूटाने शतकी खेळी केली. मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाची लाज राखलेल्या अजिंक्य रहाणे याला विशेष काही करता आले नाही. रहाणेने कसोटी मालिकेनंतर परतल्यावर मोठा निर्णय घेतला आहे.(Mumbai News)
रहाणेने भारतीय कसोटी संघात जून महिन्यात पुनरागमन करण्यापूर्वी लिसेस्टरशायरकडून खेळण्यासाठी करार केला होता. त्यामुळे तो ऑगस्टमध्ये लिसेस्टरशायरकडून वनडे कप खेळण्याची अपेक्षा केली जात होती. मात्र, त्याने आता माघार घेतली आहे. क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारताला पुढील कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डिसेंबर-जानेवारी दरम्यान खेळायची आहे. त्यामुळे आता त्यावेळी रहाणे पुन्हा भारताकडून खेळताना दिसू शकतो.(Mumbai News)
अजिंक्य रहाणे कसोटी संघापासून जवळपास १७ ते १८ महिने दूर होता. मात्र, आयपीएल १६ व्या मोसमात त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना आपली छाप सोडली. त्यानंतर रहाणेची टीम इंडियात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली. विंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी रहाणेला उपकर्णधार करण्यात आलं. या मालिकेत रहाणेने निराशा केली. विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर रहाणे काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार होता. मात्र रहाणेने क्रिकेट क्लब लिस्टेटरशायरमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. रहाणे आणि लिसेस्टरशायर यांच्यात करार झाला होतो. करारानुसार, रहाणेला पुढील महिन्यात होणाऱ्या मेट्रो बँक वनडे कपही खेळायचा होता.(Mumbai News)
अजिंक्य रहाणे याने क्रिकेटपासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. लिसेस्टरशायर क्लबने एक प्रसिद्धपत्रक जाहीर केलंय. त्यानुसार, “अजिंक्य रहाणे जून महिन्यात खेळायला येणार होता. मात्र नॅशनल ड्युटीमुळे रहाणेने आपलं नाव मागे घेतलं. तसेच रहाणेने ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याची इच्छा व्यक्त केलीय”, असं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. त्यामुळे आता रहाणेच्या जागी पीटर हॅंड्सकॉम्ब याचा समावेश करण्यात आला आहे.(Mumbai News)
पीटर हंँड्सकॉम्बने रहाणेचा बदली खेळाडू म्हणून लिसेस्टरशायरबरोबरील करार वाढवला आहे. त्याने या संघाकडून टी२० ब्लास्टर स्पर्धा आणि काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धा खेळली आहे.(Mumbai News)
लिसेस्टरशायरने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी माहिती दिली आहे की रहाणेने त्याच्या वाढलेल्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेमुळे त्याच्या काउंटीबरोबरील करारात बदल झाला आहे. त्याने आता ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान क्रिकेटमधून विश्रांती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
रहाणेने आतापर्यंत टीम इंडियाचं ८५ कसोटी, ९० ओडीआय आणि २० टी २० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. रहाणेने टेस्टमध्ये ५ हजार ७७, वनडेत २ हजार ९६२ आणि टी २० मध्ये ३६५ धावा केल्या आहेत.(Mumbai News)