Mumbai News : मुंबई : मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा धोक्याचा इशारा मिळत नाही. मुंबईतील छाबड हाऊसवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कुलाब्यामधील छाबड हाऊसची सुरक्षा वाढवली आहे. पुण्यातून एनआयएने अटक केलेल्या दहशतवाद्याकडे छाबड हाऊसचा फोटो सापडला आहे. त्यामुळे यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.(Mumbai News)
मुंबईतील छाबड हाऊसवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता.
काही दिवसांपूर्वी पुणे एटीएसने अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडे छाबड हाऊसचे गुगल फोटो सापडले आहेत. या दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे काही साहित्य सापडले आहे. या दहशतवाद्यांकडे छाबडा हाऊसचे फोटो सापडल्याने पोलीस अलर्ट झाले आहेत. छाबड हाऊसभोवती बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.(Mumbai News)
यापर्वी छाबड हाऊसवर दहशतवादी हल्ला झाला होता. पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर कुलाब्यातील छाबड हाऊस असल्याची चर्चा आहे. दरम्यान दहशतवादी पथक छाबड हाऊसमोर दाखल झाले आहे. पुण्यातून इम्रान युनूस खान आणि युनूस याकूब साकी यांच्याकडून छबाड हाऊसचे फोटो सापडल्यानंतर तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.(Mumbai News)
दरम्यान, या भागात गुरवारी मॉक ड्रिल देखील घेण्यात आले होते. पुण्याच्या कोंढवा येथून १९ जुलैला दोघा संशयितांना पकडण्यात आले होते. तपासात हे दोघे एनआयएच्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये होते. पुणे पोलिसांनी या दोघांकडून जिवंत काडतुसासह ड्रोन बनवण्याच सामान जप्त केले होते. सध्या या दोघांचा ताबा एटीएसने घेतला आहे.(Mumbai News)
मूळचे मध्य प्रदेशच्या रतलामचे असलेले हे दोघे सुफा नावाच्या मध्य प्रदेश येथील दहशतवादी संघटनेशी संलग्न असल्याचा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे. हे दोघे इसिसकडून प्रेरित असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. जयपूर येथे स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे.(Mumbai News)