Muharram शिरूर : अे अलविदा… अे अलविदा…शाहे शहि रो अलविदा.
अे हुसेन इबने अली जो जख के…सुलताना अलविदा…
हासन के हारे हुसेन के लाल, जन्नत म्याने उन्होके लाल
काफे रो के दोजख मे हाल, बोलो अय्या रो अलविदा… (Muharram)
भावनिक वातावरणात महोरम अवलिदा चे पठण करत या हुसेन…या हुसेन…, ‘नारे तकबीर’ , अल्ला… हो अकबर’ च्या गर्जना करत घोषणा देत शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात शनिवार (ता. २९) ताबूत विसर्जन करण्यात आले. मोहरण सणाचे महत्व जागवित विविध कार्यक्रम व मिरवणूकीने शांततेत ताबूतचे विसर्जन करण्यात आले. यावेळी टाकळी हाजी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (Muharram)
मुस्लीम धर्मात मोहरमच्या महिन्यापासून नवीन वर्षाला सुरूवात होते. ग्रामीण भागात उर्दु तारिखनूसार या सणाला सुरवात करण्यात येते. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी (ता. २७) ताबूत स्थापन करण्यात आली होती. या दिवसापासून भावीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तर शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी कुराण पठण करण्यात आले. (Muharram)
ताबूताच्या समोर दोन बाय दोनचा खड्डा घेतला जातो. त्याला ‘अलावा’ असे म्हटले जाते. त्यामध्ये विविध झाडांच्या काड्याआणून टाकल्या जातात. यावेळी शेरे चढविणे, फातेहाखानी असे धार्मिक विधी केले जातात. त्यानंतर येथे संतान प्राप्ती साठी नवस करण्याचा कार्यक्रम होतात. रात्री हा आलावा पेटविण्यात आला होता. या दिवसाला कत्तलकी रात्र असेही म्हटले जाते.
कवठे येमाई, मलठण, टाकळी हाजी, रावडेवाडी, सविंदणे येथे हा कार्यक्रम पार पडला. भावीकांच्या श्रद्धेपोटी हा कार्यक्रम होत असून सर्व समाजातील नागरिक गर्दी करताना दिसतात. पेढ्याचा प्रसाद व फुलांची चादर या ताबूतावर चढवून नवस फेढण्याची प्रथा आहे.
दरम्यान, शनीवारी (ता. २९) सकाळी या आलाव्या भोवती पाणी टाकून थंड करण्याची प्रथा आहे. त्यानंतर दुपारी तिलावत कुराण पठण करण्यात आले. या दिवशी नमाज पठण व उपवास (रोजा) करण्याची प्रथा आहे. अनेक मुस्लिम बांधवांनी या दिवशी उपवास केला होता. तर सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत सरबत वाटण्याचा कार्यक्रम पार पडला.
कवठे येमाई येथील सुन्नी मुस्लिम यंग पार्टी च्या वतीने शांततेत मिरवणूक पार पडली. त्यानंतर अवलिदा मोहरम चे पठण करण्यात आले. टाकळी हाजी, रावडेवाडी, मलठण येथेही शांततेत ताबूत विर्सजन मिरवणूक पार पडली.