Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणेकरांसाठी गूड न्यूज! शहरातील पाणीकपात उद्यापासून रद्द! पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 July 2023, 11:20

Pune News : पुणे  शहरात मे महिन्यापासून पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र, धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा झाला आहे. यामुळे पुण्यातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. दरम्यान ६ आठवड्यानंतर पुन्हा एकदा आढावा घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.(Pune News)

पुण्यातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणामध्ये अपुरा पाणीसाठा असल्याने पुणे महापालिकेकडून शहरात पाणीकपात लागू करण्यात आली होती. आता शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २२ अब्ज घनफूट (टीएमसी), म्हणजे ७५ टक्के पाणीसाठा झाल्याने शहरात दर आठवड्याला होणारी पाणीकपात उद्यापासून (सोमवार) रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर उपस्थित होते.(Pune News)

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला असल्याने शहरातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांतील एकत्रित पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. असे असतानाही पुणेकर मात्र दर गुरुवारच्या ‘पाणी बंद’मुळे हैराण झाले असून, ही पाणीकपात रद्द करावी, अशी आग्रही मागणी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सत्ताधाऱ्यांकडे लावून धरली होती. पालकमंत्री पाटील यांनी या पार्श्वभूमीवर तातडीची आढावा बैठक घेऊन पुणेकरांची पाणी कपातीतून सुटका केली आहे.(Pune News)

 

महापालिका खडकवासला आणि भामा आसखेड या दोन धरणांतून दररोज सुमारे १६५० ‘एमएलडी’ इतके पाणी उचलते. या पाण्यावर प्रक्रिया करून ते पुणेकरांना पिण्यासाठी, वापरासाठी देण्यात येते. दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने सुमारे पाव ‘टीएमसी’ पाण्याची महिन्याभरात बचत करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पुणेकर गेल्या अडीच महिन्यांपासून पाणीटंचाईला सामोरे जात होते. पाणी कपात गुरुवारी करण्यात येत असली, तरी त्याचा परिणाम पुढील दोन दिवसांच्या पुरवठ्यावर होत होता. त्यामुळे प्रत्यक्षात आठवड्यातील तीन दिवस पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर पाणीसाठा ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने पाणीकपात तातडीने रद्द करावी, अशी मागणी राजकीय क्षेत्राबरोबरच स्वयंसेवी संस्थांकडूनही करण्यात आली होती.(Pune News)

या वेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, वर्षभरात पिण्याचे पाणी व शेतीसाठी साधारण ३० ‘टीएमसी’ पाण्याची आवश्यकता असते. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा हा गतवर्षीपेक्षा अधिक आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. शेतीसाठी लागणारे पाणीही देण्यात यावे; तसेच धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले तलावही भरण्यात यावेत. येत्या काळात पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील.(Pune News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post

Shirur Muharram News : शिरूरला ताबूत व सवाऱ्यांच्या मिरवणूका ; मोहरम- नमाज पठण व धार्मिक कार्यक्रम शांततेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.