Pune News : चाकण (पुणे) : रात्रीच्या वेळी संशयितरीत्या फिरत असलेल्या तिघांना हटकल्याच्या कारणावरून तिघांनी एका पोलिस अधिकाऱ्याच्या डोळ्यात चक्क मिरचीचा स्प्रे मारल्याची घटना घडली आहे. या घटनेत संबंधित अधिकारी जखमी झाल्याची घटना घडली आहे.(Pune News)
अधिकाऱ्याच्या डोळ्यात चक्क मिरचीचा स्प्रे मारल्याची घटना.
चाकण, मेदनकरवाडी (ता. खेड) हद्दीतील बंगला वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका टपरीजवळ बुधवारी (ता. २६) साडेबारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.(Pune News)
निहाल हरपाल सिंग (वय ३५, रा.मुंबई) व मंगेश लक्ष्मण गायकवाड (वय ३२, रा. रहाटणी, पुणे) यांना अटक करण्यात आली. तर, संजय पडवळ (पूर्ण, नाव व पत्ता निष्पन्न नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षका अमोल रमेश डेरे (वय ४७, रा. चाकण) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune News)
चाकण पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक अमोल डेरे हे आपल्या सहकाऱ्यासमवेत बुधवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान चाकणसह मेदनकरवाडी भागात पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना मेदनकरवाडी हद्दीतील एका टपरीजवळ तिघेजण संशयास्पद फिरताना दिसून आले. पोलिसांना पाहताच ते तिघेजण तेथील टपरीजवळ लपून बसले.(Pune News)
चोरी करण्याच्या उद्देशाने अथवा चोरी करण्याच्या तयारीत ते भामटे त्याठिकाणी आले असावेत, असा संशय पोलिसांना आल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांच्याजवळ असलेला मिरचीचा स्प्रे डेरे यांच्या डोळ्यावर फेकला.(Pune News)
यावेळी डेरे किरकोळ जखमी झाले आहेत. शासकीय कामात अडथळाही आणला. पोलिसांनी त्यांना पकडून अंगझडती घेतली असता वरील तिघांकडे बनावट प्लास्टिकची पिस्टल, मिरची स्प्रे व एक स्क्रू ड्रायव्हर मिळून आला. चाकण पोलिसांनी आरोपी सिंग व गायकवाड यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद केले आहे.(Pune News)
दरम्यान, चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.(Pune News)