Pune News : पुणे : पुण्यात नक्की चाललंय काय, असा प्रश्न पडत आहे. अल्पवयीन मुलींच्या अज्ञानाचा, असाहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तर कधी त्यांना धमकावून बलात्कार केल्याच्या घृणास्पद घटना उघडकीस येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून, शारीरिक संबंध ठेवल्याने अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एकाच दिवशी पोक्सो अंतर्गत ३ गुन्हे दाखल केले असून, दोघांना खडक व स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. गणेश पेठ, स्वारगेट, मोहम्मदवाडी परिसरातून या घटना उघडकीस आल्यामुळे पुणे हादरले आहे.
गणेश पेठ, स्वारगेट, मोहम्मदवाडी परिसरातील घटना
शहरात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे गुन्हे एकाच दिवशी दाखल झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य समोर आले. हे तिनही गुन्हे सोमवारी (ता. २४) एकाचवेळी दाखल झाले आहेत. (Pune News) या प्रकरणी तिन्ही मुलींनी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिन्ही प्रकारातील आरोपींविरोधात भारतीय दंड विधान आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोस्को) २०१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही घटनांतील आरोपींना अटक केली असून ते आता कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणेश पेठेत राहणाऱ्या एका १७ वर्षाच्या मुलीने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी प्रमोद महादेव ठोबळे (वय २८, रा. महात्मा फुले पेठ) याला अटक केली आहे. फिर्यादी आणि आरोपी प्रमोद यांची ओळख होती. तो फिर्यादी मुलीच्या मैत्रिणीचा चुलत भाऊ आहे. फिर्यादीच्या घरी कोणी नसताना प्रमोद तिच्या घरी आला. तिच्या असाहाय्यतेचा गैरफायदा उठवला. तिच्यावर वारंवार जबरदस्ती करत होता. (Pune News) एप्रिल २०२३ मध्ये आरोपी मुलीच्या घरात कोणी नसताना गेला. त्यावेळी त्याने मुलीशी जबरदस्तीने अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी ३ महिन्यांची गर्भवती राहिली. त्यानंतर मुलीच्या घरच्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यातून ही मुलगी ३ महिन्यांची गर्भवती राहिली. त्यानंतर आता गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा मजुरीचे काम करतो. न्यायालयाने त्याला २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे खडक पोलिसांनी सांगितले.
महंमदवाडी येथे राहणाऱ्या एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी गणेश वाघमारे (वय २०, रा. चंदननगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या १५ वर्षांच्या बहिणीस गणेश वाघमारे याने मे २०२३ ते २७ जुलै २०२३ दरम्यान वेळोवळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध केले. (Pune News) त्यातून ती दीड महिन्यांची गर्भवती राहिली आहे. तिच्याच नातेवाईकाने तिचा गैरफायदा घेतला आहे. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक केली. घरात, आडबाजूला, लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून तपास सुरू असल्याचे चंदननगर पोलिसांनी सांगितले.
तिसरी घटना स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. १५ वर्षीय मुलगी तिच्या जवळच्या नातेवाईकाच्याच वासनेची शिकार झाली. त्यातून ती ८ महिन्यांची गर्भवती राहिली. पीडित मुलगी स्वारगेट परिसरात पथारी व्यावसायिक आहे. बलात्कार करणारा आरोपी तिचा नातेवाईक असून, ते दोघे एकाच घरात राहात होते. (Pune News) आरोपीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवत ऑगस्ट २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले आहे. पीडितेने तक्रार देताच आरोपी अशोक अनिल काळे (वय २०) याला पोलिसांनी अटक केली. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे शहरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची विश्रांतवाडी पोलिसांनी काढली धिंड..