Pimpri News : पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात डोळे येण्याची साथ वाढत असतानाच आता डेंग्यूचे संशयित रुग्ण देखील वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरात डेंग्यू आजाराचे २७ संशयित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर डासोत्पत्ती ठिकाणे असलेल्या ७३८ आस्थापनांना महापालिकेने नोटीस दिल्या आहेत. तर ८४ आस्थापनांकडून तीन लाख ३७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
डेंग्यूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे उपाययोजना
डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी डासोत्पत्ती ठिकाणांची शोधमोहीम तीव्र करून डेंग्यू आजार नियंत्रित करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. (Pimpri News) वारंवार सूचना देऊनही डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापना, बांधकाम साईट, गृहनिर्माण सोसायट्या, दुकाने आणि घरांची तपासणी करून अशी ठिकाणे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, डेंग्यूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे उपाययोजना केल्या जात आहेत. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. (Pimpri News) अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार या बैठकीस उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले की, शहरात डेंग्यू आजाराचे २७ संशयित रुग्ण आढळले आहेत. खासगी रुग्णालयांतील रुग्णांची माहिती संकलित करण्यात येत आहे. रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील दोनशे घरांमध्ये पर्यवेक्षण तसेच परिसरात औषध फवारणी, औष्णिक धुरीकरण, कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. (Pimpri News) महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आणि दवाखान्यांमध्ये डेंगीच्या तपासणीकरिता आवश्यक रॅपिड किट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दरम्यान, परिसरातील आळंदी भागात डोळे येण्याची साथ पसरली आहे. आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवली असून हा आजार संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करून दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : खळबळजनक! पिंपरीजवळ रस्त्यावर आढळले पिशवीत गुंडाळलेले अर्भक
Pimpri News : सील केलेल्या फ्लॅटमध्ये बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा