लोणी काळभोर, (पुणे) : “राष्ट्रसंत संतशिरोमणी श्री संत सेना महाराज” यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी (ता. २३) थेऊर (ता. हवेली) येथील तुळजाभवानी मंदिर येथे जेष्ठांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून नाभिक समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
श्री संतसेना नाभिक संघटना, जीव-शिवा प्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुकर पवार, रोहिदास गायकवाड, मधुकर महाबोले, संजय सांगळे या जेष्ठांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री संतसेना नाभिक संघटनेचे संस्थापक मनोहर पवार यांनी पुष्पहार अर्पण केला. सहसंस्थापक गणेश गायकवाड, सुधाकर कोकरे यांनी श्रीफळ फोडून नाभिक बांधवांनी महाआरती केली.
यावेळी या कार्यक्रमास संघटनेचेअध्यक्ष अक्षय सांगळे, उपाध्यक्ष विकास पोफळे, खजिनदारविकास व्यवहारे, उपखजिनदार माऊली सरडे, कार्याध्यक्ष आण्णासो व्यवहारे, सदस्य गणेश पोफळे, गोलू शर्मा, योगेश शिंदे, वैभव पवार, शैलेश गोरे, दत्ता वैद्य, श्रीकांत गायकवाड, काळूराम पायगुडे, सुदाम काकडे, गोवर्धन धारवाड, बबन रणदिवे, सुरेश कांबळे, हे ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते तसेच थेऊर, कोलवडी मधील सर्व नाभिक समाज बांधव व थेऊर ग्रामस्थ उपस्थित होते. सहसंस्थापक गणेश गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.