Loni Kalbhor News : लोणी काळभोर : एखादा गंभीर आजार औषधोपचाराने बरा होत नसेल तेव्हा डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देतात. शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला अनेक पथ्ये पाळावी लागतात. अवजड वस्तू उचलणे, वेगात चालणे किंवा पळणे, व्यायाम करणे तसेच अन्य ताणामुळे वेदना वाढू शकतात. या काळात काही प्रमाणात रक्तस्त्राव होणे, सूज येणे हे सामान्य असते. आजारातून लवकर मुक्ती मिळण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ऑर्थोपेडिक्स विभागाचे मुख्य डॉ. उमेश नागरे यांनी केले.
विश्वराज हॉस्पिटलमध्ये रुग्ण मार्गदर्शन आणि रुग्ण मेळावा
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये रुग्ण मार्गदर्शन आणि रुग्ण मेळावा उपक्रमाचे आयोजन सोमवारी (ता. २४) करण्यात आले होते. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. नागरे बोलत होते. (Loni Kalbhor News) या वेळी विश्वराज हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी सुधीर उत्तम, डॉ. रामप्रसाद धरणगुट्टी, डॉ. आशिषकुमार दोशी आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना विश्वराज हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी सुधीर उत्तम म्हणाले की, अनेकदा शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना वेदना होतात, सूज येते. मात्र, योग्य वेळी, योग्य उपचार मिळाल्यास रुग्ण या समस्येतून लवकर बरा होतो. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेत घेतल्यास आणि पथ्य पाळल्यास टाके लवकर सुकतात आणि शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनांचा त्रासही कमी होतो. आज असे प्रगत तंत्रज्ञान आले आहे, ज्यामुळे रुग्णाला फारसा त्रास होत नाही. (Loni Kalbhor News) कोणताही गंभीर आजार बरा करण्यासाठी शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय असतो. मात्र, पथ्य आणि औषधांच्या वेळा पाळल्यास रुग्णाला उत्तम आरोग्य मिळू शकते.
दरम्यान, विश्वराज हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सांधेरोपण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी शानदार रॅम्प वॉक करून व नाचून आनंद साजरा केला.
या वेळी ऑर्थोपेडिक्स विभागाचे डॉ. प्रमोद सुर्वे, डॉ. रामप्रसाद धरणगुट्टी, डॉ. आशिषकुमार दोशी, डॉ. सचिन कातकडे व डॉ. तबरेज पठाण, हॉस्पिटलचे कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम गोसावी व रेश्मा निवाते यांनी केले तर आभार डॉ. श्रीकांत सूर्यवंशी यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील संस्कार कोरे शिष्यवृत्ती परीक्षेत चमकला