Talegaon News : शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत १ रुपया भरुन पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन शिरूरचे कृषी सहाय्यक जयवंत भगत यांनी केले.(Shirur News)
१ रुपया भरुन पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व भारतीय कृषी विमा कंपनी व एच डी एफ शी अर्गो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानेनिर्वी (ता. शिरूर) येथे पिक विमा जनजागृती अभियान व पाठशालाचे आयोजन शनिवारी (ता.२२) करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना वरील आवाहन जयवंत भगत यांनी केले आहे. यावेळी विमा कंपनीचे प्रतिनिधी आकाश वडघुले, राजेश चौधरी, विनोद सोनवणे नंदकुमार सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.(Shirur News)
पुढे बोलताना भगत म्हणाले कि, नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. अशा वेळी शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारच्या वतीने ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ सुरू करण्यात आली. या पूर्वी पिकविम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, यंदा एक रुपयात पिकविमा काढून मिळणार आहे.(Shirur News)
यावेळी बोलताना राजेश चौधरी म्हणाले कि, एक रुपयाला आज कोणतीही गोष्ट मिळत नाही. पण एक रुपयात पिक विमा मात्र निघतो आणि पिकांना संरक्षण मिळते. ही बाब नक्कीच शेतकऱ्यांच्या हिताची सरकारने राबवलेली आहे. निर्वी गावात बाराशे पंच्याहत्तर खातेदार असून पन्नास टक्के खातेदारांनी म्हणजे जवळपास सहाशे खातेदारांनी पिक विमा उतरविला असल्याची हि बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.(Shirur News)
सध्या शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली आहे. या पिकाला संरक्षण मिळावे, यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिकासाठी संरक्षित असणारी रक्कम मिळणार असून, या वर्षापासून एका पिकाला केवळ एक रुपया लागणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच सीएससी सेंटरवर जाऊन पिक विमा उतरविला जात आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांनी ३१ जुलै अखेर पिक विमा उतरावा पाहिजे. असे आवाहन आकाश वडघुले यांनी केली आहे.(Shirur News)