Nagar News : राहुरी, (नगर) जमीन खरेदीत फसवणूक झाल्याने तक्रार करण्यास आलेल्या महिलेला कारवाई केल्यावर मला काय मिळेल? असे म्हणत तिला घरी बोलावून राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकानेच (PSI) लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.(Nagar News)
पीडीत महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल.
सजन्नकुमार नाऱ्हेडा असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. नाऱ्हेडा हा सध्या राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. राहुरी पोलीस ठाण्यात बुधवारी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील एका गावातील पीडीत महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राहुरी परिसरात खळबळ उडाली आहे.(Nagar News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली प्रवरा येथील एका व्यक्तीने जमीन खरेदीत महिलेची फसवणूक केली होती. यावेळी अनोळखी इसम भेटला त्याला या संदर्भात माहिती दिली असता त्याने मोबाइल नंबर दिला व म्हणाला की, हे राहुरी पोलीस स्टेशनचे साहेब आहेत. त्यांना तुम्ही फोन करा ते तुमची तक्रार घेतील. मोबाइलवरून फोन लावून त्यांनी संगितले की, दोन दिवसानंतर माझ्या ऑफिसमध्ये या. मी दोन दिवसानंतर पोलीस स्टेशनला येणार आहे.(Nagar News)
सदर महिला हि नाऱ्हेडा याच्या केबिनमध्ये तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी नाऱ्हेडा याने तुम्हाला पती नाही का? तुम्ही एकट्याच आलेल्या आहात का? तुमच्यासोबत कोणी नाही आले का? कास्ट कुठली आहे? असे प्रश्न मला विचारले. त्यानंतर म्हणाले की, तुमचे काम मी करून दिल्यास यामध्ये माझा काय फायदा आहे?(Nagar News) त्यावर मी त्यांना म्हणाले की, मी तुम्हाला ५० हजार रुपये देईल. नंतर ते मला म्हणाले की, पैशाव्यतिरिक्त माझा काय फायदा होईल? त्यावेळी मी म्हणाले की, आणखी पैसे पाहिजे असेल तर देईल. मात्र तेव्हा ते मला म्हणाले की, मला पैसे नाही पाहिजेत. मला काय पाहिजे आहे ते समजून घ्या तुम्ही.
दरम्यान, ८ दिवसांनी नाऱ्हेडा यांना फोन करून मी माझ्या तक्रार अर्जाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, मला फोन करायचा नाही. तुमचे काय काम आहे ते माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला सांगायचे. त्यानंतर मी अर्जाबाबत चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशनसमोर उभी असताना नार्हेडा यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवरुन मला तू खुप छान दिसते, असा मेसेज केला होता. तसंच नंतर मला धमकावून रूमवर नेत त्यांनी माझ्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.(Nagar News)
सदर महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.