Pune News : मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेले हॉटेल बंद करण्यास सांगितल्याने हॉटेल चालकाने डेक्कन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांशी वाद घालून अरेरावी करून कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.(Pune News)
हॉटेल चालकाला अटक :
भिडे पुलाजवळील नदीपात्रातील चौपाटी परिसरात हि घटना घडली आहे. याप्रकरणी हॉटेलचालकावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालकाला अटक करण्यात आली आहे.(Pune News)
सचिन हरिभाऊ भगरे (वय ३३, रा. कबीर बाग परिसर, नारायण पेठ) असे अटक करण्यात आलेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल, गाडे, पानाचे ठेले यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. नदीपात्रातील चौपाटी येथील हॉटेल ‘सद्गुरू’ मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू होते.(Pune News)
रात्रपाळीत गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. पोलिसांनी हॉटेल बंद करण्यास सांगितले. त्यावेळी हॉटेल चालक भगरेने पोलिसांशी वाद घातला. पोलिसांनी कारवाई करण्यासाठी त्याला डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेव्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याशी भगरे याने हुज्जत घातली. ‘तुला काय करायचे ते कर,’ अशी भाषा भगरेने वापरली. त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भगरे याला अटक करण्यात आली.(Pune News)