Loni kalbhor News लोणी काळभोर : राज्यातील मातंग समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही. (Loni kalbhor News) राज्य सरकारने त्याकडे लक्ष देऊन मातंग समाजाला न्याय द्यावा. (Loni kalbhor News) अशी मागणी समाजसेवक शंकर तडाखे यांनी केली आहे. (Loni kalbhor News)
”दवंडी यात्रे”चे लोणी काळभोर येथे मोठ्या उत्साहात स्वागत
मातंग समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ”दवंडी यात्रे”चे लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मोठ्या उत्साहात सोमवारी (ता.१०) स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना समाजसेवक शंकर तडाखे यांनी वरील मागणी दिली
पुढे बोलताना तडाखे म्हणाले कि, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीतील नागरिकांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण वर्गीकरण करून मिळावे. या साठी ”दवंडी यात्रे”चे आयोजन सकल मातंग समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून तमाम मातंग समाज दवंडी यात्रेमध्ये सक्रिय व्हा. व आपण २० जुलैला याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांना देणार आहेत. असे तडाखे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, कवडीपाट टोल- नाक्यावरून ‘हलगी वाजवून दवडी यात्रेला समाजबांधवानी उपस्थीत राहावे. असे आवाहन समाजसेवक शंकर तडाखे यांनी केले आहे.
यावेळी कदमवाकवस्तीच्या ग्रामपंचायत सदस्या सिमीता लोंढे, गणेश आदमाने, रोहीत भिसे, राकेश लोंढे, दिंगबर जोगदंड, संदीप बडेकर, लवी रिठे, आशा भोसले, राणी कांबळे, काकू कदम व मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.