Pune News : पुणे : दशक्रिया विधीला लागणाऱ्या साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना पुण्यातील ओंकारेश्वर घाट परिसरात शुक्रवारी (ता. ८ ) सकाळी ८ वाजण्याच्या सुमरास उघडकीस आली आहे. Pune News :
याप्रकरणी पौराहित्य अथर्व प्रशांत मोघे (वय २०, रा. सिंहगड रोड) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दशक्रिया विधीचे पौराहित्य करतात. दशक्रिया घाट इमारतीमधील कपाटात त्यासाठी लागणारे साहित्य ठेवलेले असते. चोरट्यांनी इमारतीचे शटर उचकटून आत प्रवेश केला. कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १० मोठी ताम्हणे, १९ पळ्या, १० छोटी ताम्हणे, २ तांबे असा ६ हजार ६०० रुपयांची भांडी चोरुन नेली.
याप्रकरणी पौराहित्य अथर्व मोघे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भोसले आहेत.
दरम्यान, छोट्या मोठ्या चोर्या करुन त्याची विक्री करुन त्यातून आलेल्या पैशांमधून व्यसने करणार्या अनेक भुरटे चोर शहरात वावरत असतात. त्यांना आता दशक्रिया विधीसाठी लागणारे साहित्यही कमी पडू लागत असल्याचे यावरून समोर येत आहे. Pune News :