युनूस तांबोळी
Shirur News शिरूर : मित्रांनो, करीयर, आरोग्य, नात हे काचेसारखे असून त्यांना तडा जाऊ देऊ नका. तुम्ही कसे माणूस वागता, आहात किंवा होता. हिच तुमची ओळख असणार आहे. असे मत पुणे डाक विभाग वरीष्ट अधिक्षक डॅा. अभीजीत इचके यांनी व्यक्त केले. (Shirur News)
कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात येमाई माता शैक्षणिक, सामाजीक व क्रिडा संघ यांच्या वतीने मोफत करियर, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती डॉ. सुभाष पोकळे होते. यावेळी अध्यक्ष नवनाथ सांडभोर, सेवा निवृत्त प्राचार्य दिलीप इचके, अविनाश पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक बोलताना डॅा. अभीजीत इचके म्हणाले कि, ज्या पदासाठी करीयर करत आहात ते जाहिर करू नका, एवढी मेहनत घ्या की तुमच्या यशाचा गवगवा झाला पाहिजे. स्पर्धेला सामोरे जात असताना पर्याय दुसरा तुमच्या जवळ असला पाहिजे. (Shirur News) कारण अधिकारी झालो तरी कामात येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. करियर साठी तुमचा पाया भक्कम असणे गरजेचे आहे. (Shirur News) आरोग्य, संपत्ती, बुद्धिमता यागोष्टींमध्ये संतुलन ठेवता आले पाहिजे.
दरम्यान, प्रमुख वक्ते अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका मिनीनाथ दंडवते, पुणे डाक विभाग वरीष्ट अधिक्षक डॅा. अभिजीत इचके, पिंपरी चिंचवड शहर पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर काटकर,राज्यकर आयुक्त ( जिएसटी ) सुभाष इचके, पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, लेखा परिक्षक ( चार्डड अकाउंट ) मधुकर खोल्लम, पशुसंवर्धन अधिकारी बाळकृष्ण मुखेकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच दीपक रत्नपारखी, माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ, बँक अधिकारी कोठारी,माहेश्वरी मंगल कार्यालयाचे मालक साळवे, अविनाश पोकळे, रितेश शहा, माजी सरपंच दिपक रत्नपारखी, माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, बाजीराव उघडे, अनिल रायकर , अमोल शिंदे, सागर मुखेकर, संतोष मुखेकर, दुडे सर, कमलेश बोरा, सोपान वागदरे, सुरेश गायकवाड, संदीप वागदरे, गोपीनाथ रायकर, भूपेंद्र चौधरी, विनायक गोसावी, संतोष काळे आदी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा निवृ्त्त अधिकारी प्रभाकर गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त प्राचार्य संजय चौधरी यांनी केले. आभार मुख्याध्यापक संपत कांदळकर यांनी मानले.