Health News : सध्या पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे या ऋतूमध्ये साथीचे आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भावही वाढत असतो. यात डेंग्यूचा धोकाही असतोच. दरवर्षी डेंग्यूमुळे अनेकांचा मृत्यू होतो. या आजारात रक्तातील प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होते. पण अशा काही वनस्पती आहेत त्या डेंग्यूवर गुणकारी असतात. याच वनस्पतींची माहिती आपण घेणार आहोत…(Health News)
वनस्पती डेंग्यूवर गुणकारी असतात.
डेंग्यू कसा पसरतो?
डेंग्यू हा एडिस इजिप्ती डास चावल्याने होतो. त्याच्या शरीरावर पांढरे पट्टे असल्याने त्याला ‘टायगर मॉस्किटो’ असेही म्हणतात. या डासाच्या आळ्या स्वच्छ पाण्यात वाढतात आणि दिवसा चावतात. डेंग्यूचा डास डंख मारून त्याचे विषाणू मानवी शरीरात पसरवतो, नंतर तो दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा त्याच्या शरी(Health News) रातही संसर्ग होतो. साधारणपणे हे 16 ते 30 अंश तापमानात जास्त वाढते. त्यामुळे पावसाळा हा त्याच्या प्रजननासाठी योग्य असतो.
प्लेटलेट्सची संख्या होते कमी
एका निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रति मायक्रोलिटर रक्तातील प्लेटलेट्स 1,50,000 ते 2,50,000 दरम्यान असतात. परंतु जेव्हा डास चावल्यानंतर ताप येतो तेव्हा ही संख्या सामान्यतः 1 लाखाच्या खाली येते. ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो.
पण अशा काही वनस्पती आहेत त्याचा रस प्यायल्यास फायद्याचे ठरू शकते.(Health News)
पपईच्या पानांचा रस
जेव्हाही तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला डेंग्यू ताप येतो आणि प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते, तेव्हा लगेच पपईच्या पानांचा रस काढून प्यावा, लवकरच फायदा होईल.(Health News)
गिलॉय रस
गिलॉय ही अशी वनस्पती आहे की तिला आयुर्वेदाचे वरदान म्हटले जाते. डेंग्यूचा ताप वाढला की त्याचा रस काढून लगेच प्यावा. त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने वाढते आणि बरे होणेही सोपे होते.(Health News)
डेंग्यू टाळण्यासाठी उपाय काय?
पावसाळ्यात पक्ष्यांसाठी ठेवलेली भांडी, नारळाची टरफले, टायर, भांडी अशा गोष्टींमध्ये पाणी साचू देऊ नका. याशिवाय कूलरचे पाणी वेळोवेळी बदलत राहा. पाण्याची टाकी उघडी ठेवली तरी त्यात डेंग्यूचे डास वाढू लागतात. त्यामुळे याची काळजी नक्की घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे.(Health News)