Shikrapur News शिक्रापूर न्यूज : एका तोतयाने सिआयडी पोलीस असल्याची बतावणी करून करून ज्येष्ठाची अंगठी लांबविल्याची धक्कादायक घटना पाबळ (ता. शिरुर) ग्रामपंचायत हद्दीतील थापेवस्ती येथील ज्ञानेश्वर मंदिराजवळ घडली आहे.(Shikrapur News)
याप्रकरणी हिरामण विठोबा वाबळे (वय-८५, रा. हरियाली व्हिलेज विक्रोळी) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिरामण वाबळे हे ज्ञानेश्वर मंदिराजवळ उभे असताना, तेथे एक अनोळखी इसम आला. अनोळखी इसमाने मी सिआयडी पोलीस आहे. येथे खून झाला आहे, मोठी चोरी झाली आहे. तुमची अंगठी आणि पैसे रुमालात ठेवा असे म्हणून फिर्यादी वाबळे यांना त्यांच्या हातातील अंगठी तसेच पैसे काढून रुमालात ठेवायला सांगितले. आणि रुमाल पुन्हा वाबळे यांच्या हातात देऊन निघून गेला.(Shikrapur News)
दरम्यान, काही वेळाने वाबळे यांनी रुमाल काढून पाहणी केली असता रुमालात फक्त पैसेच होते, मात्र अंगठी गायब झाल्याचे दिसून आले. त्यानंतर वाबळे यांच्या लक्षात आले कि, पोलीस असल्याची खोटी बतावणी करून अज्ञात चोरट्याने हातचलाखी करून आपली अंगठी लंपास केली.(Shikrapur News)
याप्रकरणी हिरामण वाबळे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश सुतार हे करत आहे.(Shikrapur News)