Pune News : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आज दोन्ही गटाच्या नेत्यांनी समर्थकांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आमदार, खासदार आणि पक्षसंघटनेतील नेते तसेच कार्यकर्ते कोणत्या बैठकीला उपस्थित राहणार, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्या पवारांची पॉवर आहे, हे सिद्ध होणार आहे.
दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकूण ५३ आमदार आहेत. त्यापैकी ४० आमदारांचं समर्थन आपल्याला असल्याचं अजित पवार गटाचे नेते सांगत आहेत. या ४० पैकी ९ जणांनी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील काही आमदार, खासदार हे आपल्यासोबत असून, आणखी आमदार-खासदार पक्षात परत येतील, असा विश्वास शरद पवार यांना आहे.(Pune News) याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज दुपारी १ वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत आमदार-खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.(Pune News) तर दुसरीकडे अजित पवार यांनी भुजबळ नॉलेज सिटीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या या मेळाव्याला किती आमदार-खासदार, नेते, कार्यकर्ते हजेरी लावणार आहे, हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
या दोन्ही नेत्यांकडे नेमके किती आमदार-खासदारांचे पाठबळ आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळेच शरद पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. (Pune News) तर दुसरीकडे अजित पवार यांनीही कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यातूनच राष्ट्रवादीतील आमदार-खासदार, कार्यकर्ते-नेते यांचे कोणत्या पवारांना पाठबळ आहे, हे स्पष्ट होणार असल्याने या बैठकांकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, या दोन्ही नेत्यांनी बैठक आणि मेळाव्याला उपस्थित राहण्यासंदर्भात व्हीप काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची अडचण झाली आहे. अजित पवार गटाचे प्रतोद, मंत्री अनिल पाटील यांनी आमदारांसाठी व्हीप काढला असून, त्यात आमदारांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Pune News) तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते म्हणून जयंत पाटील यांनीही आमदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळं आता इकडे आड, तिकडे विहिर, अशी आमदारांची स्थिती आहे. आमदार कुणाच्या बैठकीला जातात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : शरद पवारांची मोठी घोषणा… आम्ही महाविकास आघाडीसोबतच! म्हणाले, पुन्हा एकदा…
Pune News : बाथरुमचे दार वाजविल्याने शिक्षिकेची मुलाला स्टिलच्या रॉडने मारहा ; पुण्यातील घटना..