गणेश सुळ
School News केडगाव : देलवडी (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी श्रेया इंटेलिजंट्स अकेडमी परीक्षेत घवघवित यश संपादन केले आहे. (School News) श्रेया इंटेलिजंट्स अकेडमी परीक्षेत जवळपास १०० विध्यार्थी परीक्षेस उत्तीर्ण झाले आहेत. (School News) यामध्ये काहीचा राज्यात तर काहींचा केंद्रात नंबर मिळविण्यात यश मिळाले आहे. (School News)
राज्यात शालेय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. यामध्ये पाचवी – आठवीच्या टप्प्यावर होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा या सरकारी परीक्षांच्याच जोडीने अनेक स्थानिक स्पर्धा परीक्षांचाही समावेश आहे.
विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा, म्हणून त्यांना शालेय पातळीवरील अशा परीक्षांची तयारी करण्यासाठी पालकांकडूनही प्रोत्साहन दिले जाते. हीच बाब विचारात घेऊन राज्यातील बहुतेक शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर विविध शालेय स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते.
मुलांच्या शालेय जीवनापासून या परीक्षांना अनन्यसाधारण महत्व आहे. या परीक्षांना प्रत्येक विद्यार्थी प्रविष्ठ होणे आवश्यक आहे. यातून पालकांनी / शिक्षकांनी यश अपयश न पाहता विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचे ज्ञान मिळते याचा विचार केला पाहिजे. या परीक्षांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देलवडी यांना मिळालेल्या यशाबद्दल सर्व अध्यपकाचे तसेच यशस्वी विद्यार्थ्याचं परिसरातून कौतुक होत आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना नुकतेच गौरविण्यात आले.
शालेय स्पर्धा परिक्षेमुळे विद्यार्थ्याना वेळेचे नियोजन, उत्तर देण्याची पद्धत व विचारांची अचूकता अशा गोष्टींचे ज्ञान अवगत होते. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती व विचारांची क्षमता वाढते. तसेच परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढतो. परीक्षेबद्दलची भीती कमी होते. या आणि अशा अनेक गोष्टींचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. या अनुषंगाने हि परीक्षा घेतली जाते.
विठ्ठल गुंड (मुख्याध्यापक)