Loni Kalbhor News लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील सागर अशोक काळभोर यांची हवेली तालुका देखरेख संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. (Loni Kalbhor News)
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील संघाच्या कार्यालयात हवेली तालुका देखरेख संघाची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. हि निवडणुक प्रक्रिया निवडणुक निर्णय आधिकारी नरेश शिरसम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या निवडणूक प्रक्रियेत हवेली तालुका देखरेख संघाच्या अध्यक्षपदी सागर काळभोर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती व संस्थेचे संचालक नितीन दांगट, उपाध्यक्ष जितेंद्र कोंडे, सुभाष टकले, वसंत जगताप, कल्याणराव शिंदे, मिलापचंद गायकवाड, माताळे सर उपस्थित होते.
दरम्यान, हवेली तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव यांच्या कामकाजावर देखरेख करणे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना कर्ज वाटप करण्यात व कर्ज वसुली करण्यात मदत करणे. आदी कामे हवेली तालुका देखरेख संघ करतो.
जेष्ठ नेते कै. अशोक काळभोर यांची शिकवण मनात ठेऊन प्रताप गायकवाड, विकास दांगट, दिलीप काळभोर, प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करणार आहे. तसेच शेतकरी व सचिव यांच्यात समन्वय साधून शेतकरी हिताचे काम करणार आहे. असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष सागर काळभोर यांनी सांगितले.