Shirur News शिरूर : आषाढ महिन्याच्या पोर्णीमेला गुरूपोर्णीमा म्हणतात. या दिवशी गूरूजी पूजा केली जाते. आपल्या जीवनात नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. (Shirur News) जे आपले जीवन अंधारातू प्रकाशाकडे घेऊन जातात. (Shirur News) त्याचे पूजन या दिवशी श्रद्धेने केले जाते. शिरूर तालुक्याच्या बेट भागातील शाळांमधून गुरू पोर्णीमा साजरी करण्यात आली. (Shirur News)
मलठण ( ता. शिरूर ) येथील थोरातवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी गुरूंचे पूजन करून गुरूपोर्णीमा साजरी केली. मुख्याध्यापक युवराज थोरात व उपशिक्षीका सारीका दंडवते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मलठण येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
जांबूत ( ता.शिरूर ) येथील जय मल्हार हायस्कूल मध्ये गुरू पोर्णीमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक सतीष फिरोदिया यांनी गुरू पोर्णीमेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरू पोर्णीमा साजरी करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक शांताराम पोकळे यांनी दिली.
रांजणगाव गणपती ( ता. शिरूर ) येथील महागणपती स्कूल मध्ये गुरूपोर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पूजन केले. गुरूपोर्णीमेच्या शुभेच्छा दिल्यावर शिक्षकांनी याचे महत्व पटवून दिले.
यावेळी बोलताना माशेरे महाराज म्हणाले की, जीवनात आपले पहिले गूरू हे आई वडील असतात. त्यांचे पूजन करणे, त्याबरोबर त्यांनी दिलेल्या संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे. शिक्षक हे गुरूच आहे. त्यामुळे जीवनात यशस्विता मिळविण्यासाठी त्यांनी दिलेला मुलमंत्र जोपासणे गरजेचे आहे. सध्या तरूणांमध्ये वाढलेली व्यसनाधिनता संपविण्यासाठी गुरूंनी देखील पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.