पुणे : भारतातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी CUET ही परीक्षा देणं आवश्यक आहे. भारतातील ही दुसर्या क्रमांकाची प्रवेश परीक्षा आहे. यंदा 14.9 लाख विद्यार्थ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केलेले आहे. यंदा 6 टप्प्यांमध्ये ही परीक्षा पार पडत असल्याने 20 ऑगस्ट ऐवजी 28 ऑगस्ट पर्यंत परीक्षा आयोजित केलेल्या आहेत. यंदा 2.01 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.
NTA कडून आज (19 ऑगस्ट) CUET UG Admit Card 2022 for Phase 5 exam जारी करण्यात आले आहे. जे विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत त्यांना हॉल तिकीट्स NTA CUET ची अधिकृत वेबसाईट cuet.samarth.ac.in वर पाहता येणार आहे. पाचव्या सत्रातील ही परीक्षा 21,22 आणि 23 ऑगस्ट दिवशी होणार आहे. भारताबाहेरही 9 शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेबाबतचे अपडेटस तुम्हांला NTA CUET च्या वेबसाईट वर वेळोवेळी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
कसं डाऊनलोड कराल हॉल तिकीट?
-NTA CUET ची वेबसाईट cuet.samarth.ac.in ला भेट द्या.
-होमपेजवर “CUET UG Admit Card 2022” वर क्लिक करा.
-आता तुमचे लॉग ईन डिटेल्स टाका आणि submit वर क्लिक करा.
-तुमचं CUET UG Admit Card स्क्रिनवर पाहता येईल.
-आता हे हॉल तिकीट सेव्ह करून ठेवा किंवा त्याची प्रिंट आऊट देखील काढून ठेवू शकता.
-CUET UG परीक्षा 489 परीक्षा केंद्रांवर होणार आहे. त्यासाठी भारतातील 289 शहरांत परीक्षा केंद्रं उपलब्ध करून देण्यात आली आहेत.