Health News पुणे – प्रथिने अर्थात प्रोटीन शरीरातील विविध पेशींवर काम करून नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात. (Health News) याशिवाय प्रथिनांचे योग्य प्रमाण वजन कमी करण्यास आणि स्नायू मजबूत करतात. जे लोक शाकाहारी आहेत, त्यांच्याकडे प्रथिने मिळण्याचे फार कमी स्त्रोत असतात. पण असे काही घटक आहेत की ते मांसाहारशिवाय प्रोटीनची गरज पूर्ण करतात. (Health News)
प्रथिनांचे योग्य प्रमाण वजन कमी करण्यास आणि स्नायू मजबूत करतात.
मसूरची डाळ
डाळी हा प्रथिनांचा खूप चांगला स्रोत आहे. डाळींमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात. अर्धा कप पिवळ्या किंवा हिरव्या मसूरमध्ये सुमारे 8-9 ग्रॅम प्रथिने आढळतात. प्रोटीनसाठी तुम्ही मूग आणि हरभरा डाळ खाऊ शकता.((Health Tips)
भरपूर प्रथिनांनी भरलेला हरभरा
उकडलेले चणे किंवा हरभरा हे भरपूर प्रथिनांनी भरलेले आहेत. अर्धा कप हरभरामध्ये सुमारे 7.25 ग्रॅम प्रथिने असतात. हरभरा किंवा चणे ठराविक प्रमाणातच खा, कारण त्यात कॅलरीज जास्त असतात.(Health Tips)
वाटाणे प्रथिनांचा चांगला स्रोत
हिवाळ्यात येणारे हिरवे वाटाणे हे प्रथिनांचाही चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम मटारमध्ये 5.4 ग्रॅम प्रोटीन असते. चवीसोबतच ते पौष्टिकतेमध्येही उत्तम आहे.(Health Tips)