गणेश सुळ
Daund News : केडगाव : देलवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अविद्या सुदाम अडागले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक होणार होती. पण उपसरपंचपदासाठी सुरेखा (ताराबाई) भानुदास टकले यांचा एकमेव अर्ज आल्याने प्रशासकीय निवडणूक अधिकारी ग्रामसेवक व्ही. एन. झाडगे यांनी टकले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.(Daund News)
ग्रामसेवक व्ही. एन. झाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली.
देलवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी सरपंच निलम काटे व प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक व्ही. एन. झाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली.(Daund News) दरम्यान, सुरेखा (ताराबाई) भानुदास टकले यांची उपसरंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच कार्यालयाबाहेर जमलेल्या नागरिकांनी एकच जल्लोष केला. तसेच फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.
यावेळी भिमा पाटसचे संचालक विकास शेलार, तुकाराम ताकवणे, राजाभाऊ काटे, अनिल वांझरे , राजाभाऊ शेलार, बाप्पू शेलार, बाळासाहेब जाधव, संजय पडळकर, बंडू वांझरे, अर्जुन वाघोले, बाजीराव सुळ, काकाजी शेलार, डी. आर. (Daund News) शेलार, दत्ताभाऊ शेलार, अनिल वाघोले, केशव टकले, माजी सरपंच दत्ताभाऊ शेलार, संतोष टकले, भानुदास टकले, दिपक देसाई, मयूर शेलार, वसंत नेमाने आदी ग्रामपंचायत कमिटीसह पदाधिकारी उपस्थित होते.(Daund News)
दरम्यान, उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच टकले यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कैलाश विद्यामंदिरचे प्राचार्य प्रा.विकास टकले यांनी सर्वांचे आभार मानले.(Daund News)