Pune News : शिवणे (पुणे) : दोन इमारतींच्या मधील कम्पाउंड तारेचा शॉक लागून १६ वर्षीय विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील शिवणे भागात घडली आहे. मंगळवारी (ता. २७) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.शुभम बाळू इंगोले (वय १६, रा. ढोणे हाईट्स, शिंदे पूल शिवणे) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.(Pune News)
शॉक लागून १६ वर्षीय विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणे शिंदे पूल परिसरातील सोसायटीमध्ये राहणारा शुभम हा शिवण्यातील नवभारत हायस्कूल शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. सकाळी ११ वाजता शाळेत जातो, असे सांगून घराबाहेर पडला.(Pune News)
मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शिवणे देशमुखवाडी येथील सद्गुरू कृपा बिल्डिंग व जावळकर प्रेस्टीज या दोन इमारतींमधील चार फुटांच्या गल्लीमधून शुभम त्याच्या मित्राकडे जात असताना येथील लोखंडी जाळीला शुभमचा हात लागला.(Pune News)यावेळी त्याला जोराचा विजेचा शॉक लागला. शॉक लागल्याने शुभम काही वेळ जाळीला चिकटून खाली पडला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, शुभमचा जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलिस तसेच महावितरणचे अधिकारी व इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा केला असून, पुढील तपास उत्तमनगर पोलिस करीत आहेत.(Pune News)