Mumbai News मुंबई : मुंबईतील कांदिवलीमध्ये एक कामगार मॅनहोलमध्ये ड्रेनेजलाईन साफ करून बाहेर येत असतांना त्याच्या अंगावरून गाडी गेल्यामुळे त्याच्या मृत्यू झाला आहे. सदर संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाली आहे. (Mumbai News)
मुंबईच्या कांदिवलीतील डहाणूकरवाडी परिसरातील रस्त्यावरील मेन हॉल सफाई करून पुन्हा बाहेर येत असताना कर्मचाऱ्याच्या अंगावरून कार गेली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
जगवीर यादव (वय-३७)असे मृत सफाई कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक विनोद उधवानी आणि कंत्राटदार अजय शुक्ला अशा दोघांवरही गुन्हा दाखल होऊन त्यांना ताब्यात घेतले असून आणि त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली आहे. चालक आणि कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे एका सफाई कर्मचाऱ्याचा हकनाक बळी गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.