Pune News : पुणे : तुमचा सिबील स्कोर चांगला आहे. अमुक एवढ्या रकमेचे कर्जासाठी आपण पात्र आहात. अशा मेसेजचा धुमाकुळ आपल्या मोबाईलवर सुरुच असतो. पैशांच्या अडचणीवेळी आपण कोणताही विचार न करतो लोन घेतो. पण ते फेडताना चांगले अंगाशी आलेल्याचे प्रकार घडले आहेत. असाच एक प्रकार घडला असून फक्त तीन हजाराचे लोन घेवून त्याची परत फेड करताना तब्बल सव्वा लाख रुपये मागितल्याचे समोर आले आहे.
एका लोन ऍपद्वारे तीन हजाराचे लोन घेतले असता त्याची परतफेड करताना जास्तीची रक्कम मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune News) जास्तीची रक्कम दिली नाही म्हणून फिर्यादीच्या नातेवाईकांना अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या कॅम्प परिसरात घडला आहे.
लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
या प्रकरणी एका ३३ वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महिलेला पैशांची गरज असल्याने त्यांनी एका लोन ऍपद्वारे ३ हजार रुपयांचे लोन घेतले होते. घेतलेल्या लोनची परतफेडसुद्धा केली होती. मात्र अज्ञात व्यक्तीने महिलेला वारंवार फोन करून जास्तीच्या पैशांची मागणी केली. (Pune News) पैसे देण्यास नकार दिल्याने महिलेची बदनामी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या नातेवाईकांना मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि घाणेरडे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिलेने बदनामीच्या त्रासाला कंटाळून जास्तीचे पैसे भरण्यास सुरुवात केली.
वारंवार असे मेसेज आणि फोन करून महिलेकडून तब्बल १ लाख ११ हजार ४९८ रुपये उकळले. पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके या करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे रिंगरोडच्या भूसंपादनाला गती; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ आदेश
Pune News : सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला करणारा तरूण ताब्यात
Pune News : अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे पालकांना पडणार चांगलेच महागात