Pimpri News : पिंपरी-चिंचवड : मावळ तालुक्यातील उद्योगपती तसेच तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा शुक्रवारी (ता. १२ मे) दुपारी झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तळेगाव शहरातील मारुती मंदिर चौकात गोळीबार तसेच कोयत्याने त्यांच्यावर वार करण्यात आले होते. किशोर आवारे यांची हत्या माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या मुलाने केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. दरम्यान, या हत्या प्रकरणाला नवे वळण लागल्याची बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या दरोडा विरोधी पथकाने आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना अटक केली. पोलीसांनी त्यांच्याकडून चार पिस्तूल हस्तगत केले.
दरोडा विरोधी पथकाची कामगिरी
प्रमोद सोपान सांडभोर (वय ३३, रा. हरणेश्वर वाडी, तळेगाव दाभाडे), शरद मुरलीधर साळवे (वय ३०, रा. काळेवाडी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pimpri News ) इतर तिघेजण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचाच राग मनात ठेवून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. (Pimpri News ) त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती.
याघटनेनंतर तळेगाव दाभाडे परिसरात पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. दरम्यान, दरोडा विरोधी पथकाकडून गस्त सुरू असताना आरोपी त्यांच्या चारचाकी वाहनामधून तळेगाव दाभाडे बसस्थानक परिसरात संशयास्पद फिरत होते. पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता चार पिस्तूल आणि काडतुसे मिळून आली. (Pimpri News ) याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी प्रमोद सांडभोर आणि शरद साळवी यांना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या पिस्तूल ह्या आरोपींनी मध्यप्रदेशातून आणल्याचे चौकशीत समोर आले.
प्रमोद सांडभोर हा किशोर आवारे यांचा निकटवर्तीय असल्याचेही तपासातून समोर आले तर कोपरगाव येथील एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या खून प्रकरणात शदर साळवे हा तुरुंगात होता. दोन-अडीच महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : जेसीबी ऑपरेटरला मारहाण करत लुटले
Pimpri News : धक्कादायक! 62 वर्षीय वृद्धाकडून 9 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण
Pimpri News : हॉर्न वाजवल्याच्या रागातून एकाच्या कानशीलात भडकावली