Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : किशोर आवारेंच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आलेल्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात; ४ पिस्तुले जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 27 June 2023, 13:36

Pimpri News  : पिंपरी-चिंचवड : मावळ तालुक्यातील उद्योगपती तसेच तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा शुक्रवारी (ता. १२ मे) दुपारी झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तळेगाव शहरातील मारुती मंदिर चौकात गोळीबार तसेच कोयत्याने त्यांच्यावर वार करण्यात आले होते. किशोर आवारे यांची हत्या माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या मुलाने केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. दरम्यान, या हत्या प्रकरणाला नवे वळण लागल्याची बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या दरोडा विरोधी पथकाने आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना अटक केली. पोलीसांनी त्यांच्याकडून चार पिस्तूल हस्तगत केले.

दरोडा विरोधी पथकाची कामगिरी

प्रमोद सोपान सांडभोर (वय ३३, रा. हरणेश्वर वाडी, तळेगाव दाभाडे), शरद मुरलीधर साळवे (वय ३०, रा. काळेवाडी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pimpri News ) इतर तिघेजण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचाच राग मनात ठेवून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. (Pimpri News ) त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती.

 

याघटनेनंतर तळेगाव दाभाडे परिसरात पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. दरम्यान, दरोडा विरोधी पथकाकडून गस्त सुरू असताना आरोपी त्यांच्या चारचाकी वाहनामधून तळेगाव दाभाडे बसस्थानक परिसरात संशयास्पद फिरत होते. पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता चार पिस्तूल आणि काडतुसे मिळून आली. (Pimpri News ) याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी प्रमोद सांडभोर आणि शरद साळवी यांना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या पिस्तूल ह्या आरोपींनी मध्यप्रदेशातून आणल्याचे चौकशीत समोर आले.

प्रमोद सांडभोर हा किशोर आवारे यांचा निकटवर्तीय असल्याचेही तपासातून समोर आले तर कोपरगाव येथील एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या खून प्रकरणात शदर साळवे हा तुरुंगात होता. दोन-अडीच महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : जेसीबी ऑपरेटरला मारहाण करत लुटले

Pimpri News : धक्कादायक! 62 वर्षीय वृद्धाकडून 9 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण

Pimpri News : हॉर्न वाजवल्याच्या रागातून एकाच्या कानशीलात भडकावली

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Pune News : सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला करणारा तरूण ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.