Political News : मुंबई : शिवसेना पक्षाचे दोन गटांत विभाजन झाल्यानंतर ठाकरे गटाला अनेक धक्के बसले. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी पक्षाला रामराम केला. या धक्क्यातून ठाकरे गट सावरतोय तोपर्यंत पक्षाला आज आणखी एक धक्का बसणार असल्याचं सूचक ट्विट शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी केलं आहे. आज ‘उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होणार आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून तो खऱ्या विचारांशी निष्ठा राखणार आहे. खरा कार्यकर्ता हा कधीही ठाकरे गटासोबत राहू शकत नाही, अशा अशायाची एक कविता नरेश मस्के यांनी ट्विट केली आहे.(Political News)
शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून तो खऱ्या विचारांशी निष्ठा राखणार आहे
दरम्यान, नरेश मस्के यांच्या या ट्विटमुळे पन्हा एकदा चर्चांना सुरूवात झाली आहे.(Political News) मात्र, ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणारा शिलेदार नेमका कोण, हे या कवितेतून अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता हा नेता कोणता आहे, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
खरा कार्यकर्ता हा कधीही ठाकरे गटासोबत राहू शकत नाही. आज ‘उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होणार आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून तो खऱ्या विचारांशी निष्ठा राखणार आहे, अशा आशायाचे ट्विट करत नरेश मस्के यांनी ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला आहे.(Political News)
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटातून अनेक जणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. आता आणखी कोणता नेता शिवसेना शिंदे गटात जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(Political News)