संदीप टूले
Political News दौंड : ‘भाजप हा खोटं बोलणाऱ्यांचा पक्ष आहे ते इतकं खोटं बोलतात की समोरच्याला पार वेडं बनवतात. भाजपचे नेते 2014 साली बारामतीत येऊन म्हणाले होते की आमचे सरकार आल्यावर आम्ही पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीतच धनगर समाजाला आरक्षण देऊ. आजपर्यंत 9 वर्ष झाली. (Political News) सरकारने आरक्षण दिले नाही. कारण त्यांना आरक्षण हे द्यायचेच नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. (Political News)
दौंड तालुक्यात सध्या सुप्रिया सुळे यांचे गावभेट दौरे सुरु आहेत. त्यांचा गावभेट दौरा सोमवारी (दि.२६) एकेरीवाडी या गावात आला होता. त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘भाजपने महाराष्ट्रातील धनगर समाजाची फसवणूक चालवलेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये या फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवा.
भाजपचे नेते 2014 साली बारामतीत येऊन म्हणाले होते की आमचे सरकार आल्यावर आम्ही पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीतच धनगर समाजाला आरक्षण देऊ. आजपर्यंत 9 वर्ष झाली. सरकारने आरक्षण दिले नाही. भाजपमध्येही दोन गट आहेत, राज्याचा एक गट आणि केंद्राचा एक गट. त्यातील एक गट म्हणतो आरक्षण देऊ, दुसरा म्हणतो देता येत नाही.’
यावेळी माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, ‘जनतेने एकदा ठरवले की ठरवले. जनता ही नेत्यांचे पण ऐकत नाही. त्यामुळे ही जनता 2024 ला भाजपला त्यांची जागा नक्की दाखवेल’.
या दौऱ्यावेळी रमेश थोरात, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, योगिनी दिवेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन दोरगे, खरेदी विक्रीचे संचालक मोहन टुले, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी वाघोले, एकेरीवाडीच्या सरपंच विद्याताई टुले, उपसरपंच संजय टकले, देलवडी वि. का. चेअरमन रामकृष्ण टुले, सतीश टुले, प्रवीण टूले, बापूराव बरकडे, सुदाम टकले यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.