Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : ‘‘अंमली पदार्थांच्या सेवनाने आपल्या शरीराची किती हानी होते, याची माहिती प्रत्येकाला आहेच. त्यामुळे व्यसन करायचे की नाही हे प्रत्येकाने ठरवायचे आहे. अशा व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी व्यसनापासून दूर राहावे’’ असे प्रतिपादन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धनंजय दाभाडे यांनी केले. (Loni Kalbhor News)
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने नशापासून रहा दूर जीवन सुख मिळवा भरपूर या व्यसनमुक्ती अभियानाचे आयोजन लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दाभाडे बोलत होते. (Loni Kalbhor News)
यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, सदाशिव गायकवाड, हवालदार रामदास मेमाणे, पोलीस अंमलदार, अजिंक्य जोजारे, हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (Loni Kalbhor News)
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर म्हणाले, ‘‘मोबाईलचे बरेचसे फायदे असली तरीसुद्धा मोबाईल हे एक व्यसन बनत चालले आहे. मोबाईल एक व्यसन बनले आहे. आजची तरुण पिढी मोबाईलच्या इतकी आहारी गेली आहे की, आजच्या तरुण पिढीला मोबाईल शिवाय इतर कोणत्याही गोष्टी दिसत नाहीच. मोबाईल मध्ये असणाऱ्या सोशल मीडिया एप्स तरुण पिढीला व्यसनाधीन केले आहे. मोबाइल जितका फायद्याचा आहे तितकेच त्याचे तोटे देखील आहेत. मोबाईलचा वापर हा आपल्या फायद्यासाठी केला तर तो वरदान ठरेल अन्यथा मोबाईल एक शाप ठरेल.’’ (Loni Kalbhor News)
१८ वर्षांखालील मुलगा अथवा मुलीस सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यास परवानगी नाही..
मुलांनी अथवा मुलींनी शाळेत येताना सायकलचा वापर करावा. १८ वर्षाखालील मुलांकडून अपघात झाल्यास त्याला कोणतीही सरकारी नोकरी करता येत नाही. अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्याच्या पालकांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे मुलांनी शाळेत येण्यासाठी सायकलचा नियमित वापर करावा. (Loni Kalbhor News)