Health Tips :
आयुर्वेदात लसणाला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे.रोज रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्या तर शरीर आरोग्यदायी राहण्यास मदत होते. जाणून घ्या रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाण्याचे फायदे –
हृदय निरोगी ठेवण्यासाठी
धमन्यांना लवचिक करण्यास लसून अत्यंत फायदेशीर ठरतो. लसूण फ्री ऑक्सिजन रॅडिकल्सपासून हृदयाचे संरक्षण करण्याचे मदत करतात. त्यामुळे हृदय निरोगी राहते.
दातांच्या वेदनांवर फायदेशीर
अनेकांना दातदुखी किंवा दातांसंबंधित समस्या असतात. त्यांनी जर लसणाची एक पाकळी खाल्ली तर त्यांना या समस्येपासून दिलासा मिळण्यास मदत होईल. लसणात वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. (Health Tips) यामुळे दातदुखीपासून आराम मिळण्यास मदत मिळते. जेथे वेदना होत आहेत त्या ठिकाणी लसणाची एक पाकळी बारीक करुन लावल्यास दातांच्या वेदना दूर होतील.
भूक वाढविण्यास मदत
अनेकांना भूक न लागण्याची समस्या असते. अशा वेळी लसूण खाणे या लोकांसाठी आरोग्यदायी ठरते. लसूणमुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. यामुळे भूक वाढते. याशिवाय अनेकांना अॅसिडीटीचा त्रास असतो. (Health Tips) त्यांच्यासाठी लसून गुणकारी आहे. पोटात अॅसिड तयार होऊ लागते आणि अशावेळी लसूण खाल्यास अॅसिड तयार होण्यापासून रोखते. त्यामुळे अॅसिडीटीपासून आराम मिळतो.
पोटदुखीवर गुणकारी
अनेकांना पोटदुखीसंबंधित समस्या असते. त्याच्यासाठी लसूण अत्यंत गुणकारी ठरतो. लसणाच्या सेवनाने पोटातील आरोग्यास अपायकारक पदार्थ साफ होण्यास मदत होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : वजन कमी करण्यासाठी मनुक्याचे पाणी गुणकारी, जाणून घ्या मनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे
Health Tips : केसांच्या आरोग्यासाठी अंजीर तेल गुणकारी, जाणून घ्या कसे बनवावे याविषयी माहिती