NCP News : पंढरपूर, (सोलापूर) : पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकत आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात जोर का झटका बसण्याची शक्यता आहे. पंढरपूरमधील एका स्थानिक नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंढरपूरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद काही प्रमाणात कमी होईल हे उघड आहे. (NCP News)
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपुरातील नेते भागीरथ भालेक पक्षामध्ये अस्वस्थ असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय पक्का केला आहे. ते २७ जून रोजी भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत. बीआरएसने महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला असून, पक्ष विस्तारावर लक्ष केंद्रीत केले आहे. (NCP News)
पक्ष सोडण्याच्या भूमिकेविषयी बोलताना भागीरथ भालके म्हणाले की, अडचणीच्या काळात प्रमुख नेता गेल्यानंतर आमच्या पाठिशी ज्या पद्धतीने उभं रहायला पाहिजे होतं, तसं कोणी राहिलं नाही. आमच्यावरच टिकाटिप्पणी झाली, त्यामुळे नक्कीच स्वाभिमानाला ठेच लागली. आम्ही जनभावनेचा आदर करुन भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. (NCP News)
बीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत येत्या २७ जूनला भागीरथ भालके तेलंगण राष्ट्र समिती या पक्षामध्ये प्रवेश करतील. आज पंढरपुरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली. (NCP News)
दरम्यान, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव २७ जूनला पंढरपुरात दर्शनासाठी येणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचं मंत्रिमंडळ तसेच ४०० गाड्यांचा ताफा येणार आहे. त्याचदिवशी संध्याकाळी भागी़रथ भालके बीआरएस पक्षात प्रवेश करतील. बीआरएसच्या महाराष्ट्रातील प्रवेशाचा महाविकास आघाडीला काही प्रमाणात फटका बसेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले. (NCP News)