Pankaja Munde : बीड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष राष्ट्रीय राजकारणात आणला असून, विविध राज्यांत पक्ष विस्तारासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात अब की बार, किसान सरकार… असा नारा देत बीआरएसने राज्यातील शेतकऱ्यांना साद घातली आहे. मोट्या ताकदीने हा पक्ष पुढे येत असून, अनेक नवीन चेहरे पक्षात दाखल होत आहेत.(Pankaja Munde)
बीआरएस पक्षाने आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाने प्रवेश केल्यास मुख्यमंत्री चंद्रशेखर राव नक्कीच त्यांना न्याय देतील, असे स्पष्ट करत भारत राष्ट्र समितीचे बाळासाहेब सानप यांनी पंकजा मुंडेंना साद घातली आहे. (Pankaja Munde)
दरम्यान, पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परळीतील गोपीनाथगडावरून त्यांनी ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखविली होती. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि एमआयएमनेही पक्ष प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच पंकजा मुंडे कोठेही जाणार नाहीत, त्यांच्या रक्तात भाजप आहे, असे स्पष्ट केले होते. (Pankaja Munde)
बीडमध्ये भारत राष्ट्र समितीचे समन्वयक बाळासाहेब सानप माध्यमांशी बोलताना म्हणाले, की पंकजा मुंडे सक्षम नेतृत्व आहे. या नेतृत्वाला राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव ताकद देतील. पंकजा मुंडे पक्षात आल्या, तर त्यांचे स्वागतच करू…या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Pankaja Munde)
बीआरएस पक्षाचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले की, बीआरएसमध्ये नाराज नाही तर अनेक नवीन चेहरे रोज सहभागी होतात, जे आमदार २-३ हजारांनी पडले आहेत, तेदेखील पक्षाच्या संपर्कात आहेत. पंकजा मुंडे या बीआरएस पक्षात आल्या तर आम्ही त्यांचे स्वागत करू. या महाराष्ट्रात एक सक्षम महिला या नेत्याने जर भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला तर महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. (Pankaja Munde)
देशाचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत पंकजाताईंविषयी चर्चा करू. मला १०० टक्के विश्वास आहे. ते कोणत्याही जातीचे समीकरण न करता, जो सक्षम नेता आहे त्याला ताकद दिल्याशिवाय राहत नाहीत. पंकजाताई सक्षम आहेत, १०० टक्के त्यांना न्याय मिळेल असा विश्वासही बीआरएसचे समन्वयक बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केला. (Pankaja Munde)
भारत राष्ट्र समिती ताकदीने महाराष्ट्रात उतरली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याची समस्या घेऊन बीआरएस राज्यात काम करते. त्यासाठी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ, आमदार, खासदार उपस्थित राहतील. या विठ्ठलाचे दर्शन घेऊन राज्यातील जनतेला न्याय मिळाला पाहिजे. (Pankaja Munde)
दरम्यान, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. त्यासाठी राज्यात बीआरएसची सत्ता आली पाहिजे. म्हणून राज्यातील २८८ विधानसभा या मतदारसंघात पक्ष म्हणून लढणार आहे, अशी माहिती बाळासाहेब सानप यांनी दिली. (Pankaja Munde)