Pune Bribe Case पुणे : वीज मीटर मंजूर करून देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या (Pune Bribe Case) धानोरी येथील महावितरणच्या महिला सहायक अभियंत्याला आज शनिवारी (ता.२४) अटक करण्यात आले आहे. (Pune Bribe Case)
हर्षाली ओम ढवळे (वय ३८, सहायक अभियंता (वर्ग-२) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
वीज मीटर मंजूर करून देण्यासाठी मागितली होती १२ हजार रुपयांची लाच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लायझनींगच्या कामासाठी विद्युत ठेकेदाराकडे नोकरीस असून, ग्राहकांचे बीज मीटरची मंजुरी मिळण्यासाठी कागदत्रांची पुर्तता करुन महावितरणच्या धानोरी शाखा कार्यालयात गेले होते. तेव्हा कार्यालयातील लोकसेवक आरोपी हर्षाली ढवळे यांनी ०३ थ्री फेज कामाचे व सध्याचे ०१ थ्री फेजचे वीज मीटर मंजुर करून देण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, लोकसेवक आरोपी हर्षाली ढवळे यांनी तक्रारदार यांच्याकडे वीज मीटर मंजुर करून देण्यासाठी तडजोडीअंती १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. म्हणुन वरील प्रमाणे आरोपी हर्षाली ढवळे यांच्याविरोधात लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्यामध्ये त्याना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर तपास करीत आहेत.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.