सुरेश घाडगे : परंडा
Ashadhi Wari परंडा, (धाराशिव) : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारीला निघालेल्या पाथर्डी (जिल्हा अहमदनगर) तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवान गड येथील श्री संत भगवान बाबा पालखीचे शनिवार (दि.२४) सकाळी साडेअकराच्या सुमारास परंडा शहरात आगमन झाले. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर मित्रमंडळ व कल्याणसागर समूह पदाधिकारी, सदस्य, कल्याणसागर विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी कल्याणसागर विद्यालयाच्या प्रांगणात पालखीचे स्वागत फुलांचा वर्षाव करून केले. या पालखीच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. (Ashadhi Wari)
हरिनामाचा जयघोष व टाळ मृदुंगाच्या गजराने परंडा नगरी दुमदुमली होती. श्री ह.भ.प. डाॅ. न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री हे या पालखीचे प्रमुख नेतृत्व करत आहेत. वारकऱ्यांना स्नेहभोजनाची व्यवस्थाही करण्यात आली. वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, दिंडी प्रमुखाचा सत्कार, महाप्रसाद आदी कार्यक्रम कल्याणसागर समूहाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ठाकूर व शैला सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते पालखीची पुजा – आरती करून स्वागत करण्यात आले. (Ashadhi Wari)
यावेळी प्रज्ञा विकास कुलकर्णी, सुयशा ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, मुन्ना ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, डॉ. देवदत्त कुलकर्णी, डॉ. दयानंद पाटील, विजय पाटील, सुमितसिंह ठाकूर, समरजितसिंह ठाकूर, हिमालय वाघमारे, अजित पाटील, कल्याणसागर बँकेचे मॅनेजर मनोज ठाकूर, मुख्याध्यापक किरण गरड, मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, जगदीश डाके, हरिश जामकर, विठोबा मदने, मुकूंद देशमुख, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. स्नेहभोजनानंतर दुपारी एक वाजता पालखी सोहळा आवारपिंपरी मार्गे श्रीक्षेत्र पंढरपुरकडे मार्गस्थ झाला. (Ashadhi Wari)
107 वर्षांची परंपरा असलेला पालखी सोहळा..
दरम्यान, 107 वर्षाची परंपरा असलेला हा पालखी सोहळा श्रीसंत भगवान बाबा यांनी पकाळडोह ते पंढरपूर सुरु केला होता. पाटोदा व कुर्डूवाडी येथे पालखीचा रिंगण सोहळा होतो. पालखी प्रमुख इंद्रभान खेडकर महाराज असून, पालखी सोबत 11 हजार वारकरी आहेत. तसेच ज्ञानेश्वरी विद्यापीठ भगवानगड येथील विद्यार्थी पालखीत सहभागी झाले आहेत. (Ashadhi Wari)