आरपीआय (आठवले गट) पक्षाचा जिल्हाध्यक्षच निघाला क्लबचा मालक (क्लबचालक)
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचा पत्त्यांच्या क्लबमध्ये फोटो लावले असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे हा पत्याचा क्लब आरपीआय (आठवले गट) पक्षाचा जिल्हाध्यक्ष चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी आठ जणांना बेड्या ठोकल्या असून, ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.(छत्रपती संभाजीनगर )
रिपाइंचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पंढरीनाथ इंगळे (रा. तोरणागडनगर, म्हाडा कॉलनी) याच्यासह वसीम हरुण कासम कुरेशी (रा. पटेलनगर, चिकलठाणा) अक्षय अशोक मगरे (रा. चिकलठाणा), राजेंद्र काशिनाथ मरमट (रा. हनुमाननगर), गणेश भगवान पवार, दत्ता अमृत सुरवसे (दोघे रा. विजयनगर), अनिल सपकाळे (रा. भालगाव फाटा) आणि आकाश कल्याणराव जाधव (रा. मुकुंदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(छत्रपती संभाजीनगर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोरणागडनगर म्हाडा कॉलनीतील ‘जनाई’ नावाच्या बंगल्यात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार इंगळेच्या ‘जनाई’ नावाच्या बंगल्यावर छापा मारण्यासाठी पोलीस पोहचले.(छत्रपती संभाजीनगर )
बंगल्याच्या बाहेर लावण्यात आलेल्या पाटीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे नेते म्हणून नाव टाकलेले आहे. त्यामुळे यापूर्वी कोणी येथे कारवाई करण्यासाठी पुढे येत नव्हता. मात्र शेळके यांच्या पथकाने थेट छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकल्यावर तिथे आठजण पैसे लावून जुगार खेळत होते. हे सर्व आरोपी झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत होते. विशेष म्हणजे क्लबमध्ये एका रूमचे रोजचे भाडे तीन हजार व पत्त्याच्या एका डावावर दहा टक्के कमिशन इंगळे घेत होता.(छत्रपती संभाजीनगर )
दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळेच्या क्लबमध्ये फक्त ओळखीच्या जुगाऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता. त्याच्या घराला संरक्षक भिंत आणि गेट असल्याने आतमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याचा कुणालाच संशय येत नव्हता. दरम्यान याची महिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डमी ग्राहक गेटवर पाठविले. त्यावेळी तेथील कामगाराला ग्राहक ओळखीचे वाटल्याने त्याने गेट उघडले. त्यानंतर सिग्नल मिळताच पोलिसांनी छापा टाकत क्लबचा पर्दाफाश केला.(छत्रपती संभाजीनगर )