जनार्दन दांडगे.
Darshana Pawar Murder Case, लोणी काळभोर (पुणे)- राजगड पायथ्याशी रविवारी (ता.१८) सकाळच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आलेल्या दर्शना दत्तात्रय पवार (वय २६, रा. कोपरगाव) या मुलीचा संशयीत खुनी, राहुल हांडोरे याला जिल्हा ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टिमने गुरुवारी (ता. 22) पहाटे एका ताब्यात घेतले आहे. (Darshana Pawar Murder Case) राहुल हांडोरे हा संशयीत खुनी मुळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा गावाचा असुन, त्यास ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. (Darshana Pawar Murder Case)
दर्शना पवार यांचा मृतदेह राजगड किल्यावरील सतीचा माळ परिसरात आढळला
राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकाविलेल्या दर्शना दत्तात्रय पवार (वय २६, रा. कोपरगाव) यांचा मृतदेह राजगड किल्यावरील (ता. वेल्हे) सतीचा माळ परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह रविवारी (ता.१८) सकाळच्या सुमारास आढळून आला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. जिल्हा ग्रामिण पोलिसांच्यासह शहर पोलिसांनीही दर्शना पवार प्रकरणात तपास सुरु केला होता.
पोलिस सुत्रांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना आणि राहुल दोघेही सोमवारी (ता. 12 जून) राजगडावर दुचाकीने गेले होते. त्याच दिवसी साधारण 6 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यानंतर दोघांही गड चढायला सुरुवात केली होता. गडाकडे जातांना दोघे गेले असले तरी, 10 वाजनेच्या सुमारास गडाच्या बाजुने राहुल एकटाच परत येताना पोलिसांच्या तपासात निस्पन्न झाले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्हीतून ही माहिती समोर आली होती.
दरम्यान, जिल्हा ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह तब्बल पाच टिम राहुलच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन होत्या. रविवारपासुन गायब असलेल्या राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रज असल्याचे पोलिसांना आढळुन आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला. पुण्यातून गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याच्या एटीएम कार्डवरुन पैसे काढण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यानं त्याच्या एका नातेवाईकाशी फोनवरुन संवाद साधला होता. एका मित्राशी वाद झाल्यानं पुणे सोडलं असल्याचं तो म्हणाला
त्यानंतर कसलीही माहिती न देता त्यानं फोन बंद केला होता. त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता ते कोलकाता होतं. राहुलच्या प्रत्येक हालचाली वर पोलिस यंत्रना लक्ष ठेऊन होत्या. यात पोलिसांना यश आले असुन, पोलिसांनी गुरुवारी (ता. 22) पहाटेच्या सुमारास पोलिसांना राहुल यास ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. याबाबत पोलिसांनी अधिकृतरित्या जाहीर केले नसले तरी, पोलिस सुत्रांनी मात्र याबाबतची पुष्टी केली आहे.
दर्शना पवारने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून (MPSC) राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने पास होत फॉरेस्ट ऑफिसर (RFO) पोस्ट मिळवली होती. त्यामुळे तिचा पुण्यात सत्कार आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार स्वीकारण्यासाठी दर्शना पुण्यात आली होती. त्यामुळे ती नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे थांबली होती. पुण्यात दोन, तीन ठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभानंतर ती मैत्रिणीला आणि घरच्यांना सांगून सिंहगडावर आणि राजगडावर ट्रेंकिगला गेली होती. ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी सगळीकडे चौकशी केली. अखेर कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : दर्शना पवारचा खूनच झाल्याची पोस्ट मार्टम रिपोर्टमधून माहिती समोर