Cyber Crime : पुणे : मुंबईचे सायबर डीसीपी हेमराजसिंग राजपुत आणि अजय कुमार बन्सल यांची नावे वापरून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही प्रकार बाणेर परिसरात घडला आहे.
अज्ञात व्यक्ती विरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तुमचे आयडी वापरून परदेशातून तुमच्या नावे कुरियर आले आहे ते जर तुमचे नसेल तर तक्रार दाखल करावी लागेल असे सांगून ९८ हजार ७२६ रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.(Cyber Crime ) या प्रकरणी बाणेर परिसरात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
महिलेला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. मुंबईचा सायबर डीसीपी बोलत आहे असे सांगून सायबर चोरटे तुमच्या आयडीचा वापर करत आहेत.(Cyber Crime ) तुमच्या नावे परदेशातून कुरियर आले आहे. कुरियर तुम्ही मागवले नसेल किंवा तुमचे नसेल तर तात्काळ सायबर पोलिसांना तक्रार करा असे सांगितले. सायबर क्राईम अंधेरी अशा नावाचा स्काईप आयडी वापरून वेगवेगळी करणे देत महिलेच्या मोबाईलचा ताबा मिळवला. त्यांनतर एकूण ९८ हजार ७२६ रुपये परस्पर पैसे ट्रान्स्फर करून घेतले. मात्र संशय आल्याने महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक चिंतामण अंकुश हे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Cyber Crime : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने कॉम्प्युटर इंजिनिअरला घातला गंडा
Cyber Crime | आभासी चलनात गुंतवणूक करणं पडलं महागात; व्यावसायिकाची तब्बल एक कोटींची फसवणूक…