Big Breaking मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. (Big Breaking) त्यात आता प्रसिद्ध लोककलावंत आणि लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीत जाहीर प्रवेश केला.
सुरेखा पुणेकर यांनी केवळ एक तमाशा कलावंत एवढ्यावरच मर्यादित न राहता लोककला क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे त्यांचा हा राजकारणातील प्रवेश महत्वाचा आहे. सुरेखा पुणेकर यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम सुरु केलं. वयाच्या आठव्या वर्षी पारावरच्या तमाशामधून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांचे वडील पुण्यातील रेल्वे स्टेशनवर हमाल होते. हमाली करत करत कोंडीबा टाकळीकर हा त्यांचा तमाशाचा फड देखील चालवायचे. यामुळेच त्यांच्या लावणीला सुरुवात झाली. पण त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून राजकीय जीवनाला सुरुवात केली.
2021 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश
सुरेखा पुणेकर यांनी 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही सहकाऱ्यांसोबत प्रवेश केला होता. पण आता त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भारत राष्ट्र समितीत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.