Yoga News : लोणी काळभोर : आजच्या धकाधकीच्या आयुष्यात निरोगी राहण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. श्वास घेण्याच्या व्यायामामुळे आपले मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो, असे मत विश्वराज हॉस्पिटलचे विभाग प्रमुख डॉ. सुधीर चंद्र उत्तम यांनी व्यक्त केले.(Yoga News)
विश्वराज हॉस्पिटलमध्ये “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात
लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये “आंतरराष्ट्रीय योग दिवस” बुधवारी (ता. २१) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी डॉ. उत्तम बोलत होते. या वेळी हॉस्पिटलमधील आहारशास्त्र आणि पोषण विषयातील तज्ज्ञ डॉ. श्रद्धा खुस्पे, विभागप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Yoga News)
या वेळी बोलताना डॉ. सुधीर चंद्र उत्तम म्हणाले की, योगाने व्यक्तीचे शरीर, मन आणि आत्मा यांना पुनरुज्जीवित करणे शक्य आहे. यामुळे योगा हा व्यायामाचा सर्वात प्रभावशाली प्रकार बनला आहे. योगासने केल्याने फक्त शरीरच तंदुरुस्त राहत नाही, तर त्यामुळे मनःशांती, तजेलदार त्वचा मिळते. तसेच वजनातही घट होते.(Yoga News) योगासने करण्याला वयाची कोणतीही मर्यादा नसते. फक्त तुमच्या शरीरयष्टीनुसार व तुम्हाला असलेल्या व्याधींनुसार योगासने निवडावीत. योगासने दीर्घकाळ फायदे देतात.
श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे तुमची श्वसन प्रणाली निरोगी राहू शकते. स्नायूंची शक्ती राखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दररोज काही श्वास घेण्याचे व्यायाम करणे. हे आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. योगामुळे आरोग्यावर देखील सकारात्मक परिणाम होतात. याबद्दल जागरूकता निर्माण होते. कर्मचार्यांमध्ये सक्रिय जीवनशैलीला चालना देण्यासाठी या विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते.(Yoga News)