International Yoga : उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व डॉ. सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूल, उरुळी कांचनमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योगा’ दिन साजरा करण्यात आला. (International Yoga)
‘आरोग्यासाठी योगा’ हे ब्रीदवाक्य घेऊन महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना निसर्गोपचार आश्रमाचे योग मार्गदर्शक वाडेकर सर यांनी योग प्रात्याक्षिकांविषयी मार्गदर्शक सुचना देऊन योगाचे दैनंदिन जीवनातील महत्व सांगितले. (International Yoga)
विद्यालयातील शारीरिक अध्यापक संतोष टिळेकर व वाडेकर सर यांनी योग प्रात्याक्षिके सदर केली. यावेळी या कार्यशाळेस २ हजार ९३२ विद्यार्थ्यासोबत अध्यापक, अध्यापिका, पर्यवेक्षक, उपप्राचार्य व प्राचार्य अशा १०३ कर्मचाऱ्यांसह सदर कार्यक्रम पार पडला. (International Yoga)
डॉ. सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूल, उरळी कांचन येथे क्रीडा विभागाचे प्रमुख गुणवंत रोकडे, राजेंद्र चंद व आशिष शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करून घेतली. तसेच शाळेत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा संपन्न झाल्या. मागील दोन दिवसात शाळेत योग दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक पालक तसेच शाळेच्या प्राचार्या राजकुमारी लक्ष्मी उपस्थित होत्या. (International Yoga)
दरम्यान, प्राचार्या राजकुमारी लक्ष्मी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात योगाचे महत्व पटवून दिले व दररोज योगा करण्यासाठी प्रतिज्ञा दिली. (International Yoga)