Health News पुणे : कापरामध्ये अँटी बॅक्टेरिअल, अँटी फंगल आणि अँटी इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. (Health News) औषधांच्या निर्मितीमध्ये कापूराचा वापर केला जातो. (Health News) कापूर कापरामुळे घर निर्जंतुक होते. (Health News) जाणून घ्या कापूरचे औषधी फायदे –
शरीराच्या कोणत्याही भागावर खाज सुटली असेल, किंवा वारंवार खाजवण्याचा त्रास होत असेल तर खोबरेल तेलामध्ये कापूर टाकून हे मिश्रण खाज सुटलेल्या जागी लावावे.
वेदना होत असलेल्या जागी कापूरचे तेल लावून मालिश करा यामुळे सांधेदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होईल.
कापूरचे तेल तुमच्या रोजच्या वापराच्या तेलात मिसळून हलक्या हाताने केसांची मालिश केल्याने केस काळेभोर, लांब, मजबूत बनतात. शिवाय केसांतील कोंडाही निघून जातो.
टाचांच्या भेगा घालवण्यासाठी कोमट पाण्यात थोडा कापूर आणि मीठ टाकून त्यात थोडावेळ पाय सोडून बसा. त्यानंतर पाय आणि टाचा स्क्रब करून त्यावर मॉस्चराइजर क्रीम लावा. या उपायाने टाचांच्या भेगा कमी होऊन तळवे मुलायम बनतील.
कापरामध्ये दाह आणि जळजळ कमी करण्याची क्षमता असते. एखाद्या ठिकाणी मुका मार लागला असेल तर कापराची पूड करून तेलासोबत त्या भागावर लावा आणि काही मिनीटे तो भाग बांधून ठेवा. यामुळे वेदना आणि सूज कमी होते.
कापराचे तेल उशीवर टाकून झोपल्याने शांत झोप येण्यास मदत होते.
गरम पाण्यात कापूर टाकून वाफ घेतल्यास सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो .खोकला झाल्यास मोहरी किंवा तीळाच्या तेलात कापूर मिसळा आणि थोडा वेळ ठेऊन द्या. नंतर या तेलाने छातीवर हलका मसाज करा.
कापूरमध्ये अँन्टीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. यामुळे पुरळ, घामोळं, मुरुमांची समस्या दूर होण्यास मदत होते.पाण्यात थोडं कापराचं तेल मिसळा आणि पुरळ आलेल्या भागावर लावा. यामुळे त्वचेवरील पुरळ, घामोळं, त्वचेचा लालसरपणा कमी होण्यास मदत होते.