Pimpri News : पिंपरी-चिंचवड : मॅट्रिमोनियल साइटवरून विविध राज्यांतील तब्बल २५० मुलींना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्र सरकारमध्ये मोठ्या पदावर अधिकारी असल्याचे सांगत या मुलींची फसवणूक केली. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या आरोपींच्या मागावर होते मात्र प्रत्येक वेळेत ते पोलीसांना चकवा देण्यात यशस्वी झाले. आरोपींचे नाव, आधारकार्ड बनावट असल्याने तपासाचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. दरम्यान आरोपींनी एका जुन्या मोबाइलमध्ये सिमकार्ड टाकले अन् पोलीसांनी त्यांना शोधण्याचा मार्ग सापडला.
वेगवेगळ्या राज्यात जाऊन पुरावे गोळा करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
वाकड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींचा माग काढून बेंगळुरू गाठले. तेथे आठवडाभर तळ ठोकून पोलिसांनी एकाला लॉण्ड्रीवाल्याला आरोपींकडे पाठवले अन् आरोपी अलगद जाळ्यात अडकले. (Pimpri News) आरोपींनी लॉण्ड्रीवाल्याकडून कपडे धुऊन घेतले आणि पोलिसांनी आरोपींना धुतले.
वाकड पोलीस ठाण्यात एक महिला सामाजिक कार्यकर्ता तरुणीने तक्रार दाखल केली. तेव्हा एकाच व्यक्तीने तीन तरुणींना फसवण्याचे समजले.(Pimpri News ) वाकड पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे तपास देण्यात आला. पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या राज्यात जाऊन आरोपींविरुद्ध पुरावे गोळा केले आणि त्यांना बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही आरोपी जीवनसाथी मॅट्रोमॉनियल साइटवर बनावट नावाने खाते, प्रोफाइल तयार करून स्वतःला केंद्र सरकारचे बडे अधिकारी असल्याचे सांगायचे. मुलींना भेटायला जाताना आलिशान गाड्यांमधून जायचे. त्यांना लग्नाचे आमिष दाखवायचे. आरोपी एका शहरात दोन-तीन महिने थांबायचे. (Pimpri News) त्यासाठी बनावट नाव, आधारकार्ड वापरायचे. त्यांनी अशा पद्धतीने गुडगाव, जयपूर, पुणे आणि बेंगळुरू अशा महानगरांमध्ये मुली, महिलांची फसवणूक केली.
यासाठी आरोपी प्रत्येक वेळी नवीन मोबाइल घेऊन नवीन सिमकार्ड वापरायचे. त्यामुळे पोलीसांना त्यांचापर्यंत पोहचण्यास अडचणी आल्या. मात्र यातील काही मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण पोलिसांकडून सुरू होते. दरम्यान, आरोपींनी एका जुन्या मोबाइलमध्ये नवीन सिमकार्ड टाकले. (Pimpri News) त्यामुळे मोबाइल ॲक्टिव्ह झाला. त्यासोबतच एका केबल ऑपरेटर कंपनीकडून देखील पोलिसांनी माहिती घेतली. त्यावरून आरोपींचा माग काढत वाकड पोलिसांचे पथक बेंगळुरूत दाखल झाले.
दरम्यान, आरोपी राहत असलेल्या सोसायटीत एक लॉण्ड्रीवाला दररोज कपडे घ्यायला जायचा. पोलिसांनी लॉण्ड्रीवाल्याला विश्वासात घेतले. (Pimpri News) आरोपी कोणत्या फ्लॅटमध्ये आहेत, किती वाजता ते दोघेही एकत्र फ्लॅटमध्ये राहतात, याबाबत पोलिसांनी लॉण्ड्रीवाल्याकडून माहिती घेतली आणि सापळा रचून आरोपींना आपल्या जाळ्यात ओढले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : उद्योगात भागीदारीच्या आमिषाने पती-पत्नीची तब्बल 14 लाखाची फसवणूक
Pimpri News : आधी आईला केला ‘तो’ फोन नंतर तरुणाने घेतला गळफास